Neha Kakkar ने लग्नासाठी विचारल्यावर पती Rohanpreet Singh ने 'या' कारणासाठी दिला होता आधी नकार

या मुलाखतीत नेहा आणि रोहनप्रीत यांनी आपल्या लग्नापर्यंतच्या अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या. मात्र यात नेहाने एक धक्कादायक खुलासा केला तो म्हणजे नेहाने सांगितले की "मी जेव्हा रोहनप्रीतला लग्न करुया अस म्हणाली तेव्हा त्याने नकार दिला होता".

Neha Kakkar ने लग्नासाठी विचारल्यावर पती Rohanpreet Singh ने 'या' कारणासाठी दिला होता आधी नकार
Neha Kakkar And Rohanpreet Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा कक्कड़ (Neha Kakkar) ही नुकतीच रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. तिचा लग्न सोहळा हे बॉलिवूडमधील एक शाही विवाहसोहळा झाला होता. मात्र मोजक्या लोकांसह कोरोनाचे नियम पाळून हा लग्नसोहळा झाला. त्यानंतर हे दोघे दुबईत हनिमूनला देखील गेले. हनिमूनवरून परत आल्यानंतर नेहा आणि रोहनप्रीत कपिल शर्माच्या शो मध्ये गेले होते. हा एपिसोड खूपच धमाकेदार झाला. या मुलाखतीत नेहा आणि रोहनप्रीत यांनी आपल्या लग्नापर्यंतच्या अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या. मात्र यात नेहाने एक धक्कादायक खुलासा केला तो म्हणजे नेहाने सांगितले की "मी जेव्हा रोहनप्रीतला लग्न करुया अस म्हणाली तेव्हा त्याने नकार दिला होता".

याबाबत नेमकं काय झालं असं कपिलने तिला विचारताच ती म्हणाली,"मी रोहनप्रीतला सांगितले, की मला रिलेशनशिप ठेवण्यात काही रस नाही. आपण लग्न करु. मात्र त्यावर रोहनप्रीत असं म्हणाला होता की मी केवळ 25 वर्षांचा आहे."त्यानंतर पुढे काय झाले ते ऐका

हेदेखील वाचा- Neha Kakkar And Rohanpreet Singh Ring Ceremony: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांचा रिंग सेरेमनीमध्ये धम्माल डान्स; Watch Video

त्यानंतर काही दिवसांनी रोहनप्रीतने तिला भेटून मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे आपण लग्न करू असं तो म्हणाला. मात्र ती गोष्ट त्याने दारुच्या नशेत सांगितले असे तिला वाटले. मात्र दुस-या दिवशी तो त्याच्या निर्णयावर कायम राहिल्याने या दोघांनी लग्नाचा विचार केला.

नेहा आणि रोहनप्रीत 26 ऑक्टोबर रोजी विवाहबद्ध झाले. कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोहाली मध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2020 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).