Neha Kakkar ने Baby Bump फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो; 2 महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली नेहा कक्कड़ गरोदर?

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांचा पारंपारिक विधींनुसार 24 ऑक्टोबर 2020 ला विवाह सोहळा संपन्न झाला. आता बेबी बंपसहा नव्या फोटोमुळे चाहत्यांनी ती खरंच गरोदर असल्याच्या प्रश्नांंच्या कमेंट्सचा भडीमार केला आहे.

Neha Kakkar and Rohanpreet Singh (Photo Credits: Instagram)

दोन महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकलेली बॉलिवूड गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) तिचा पती रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh)सोबत सातत्याने फोटो शेअर करत असते. दरम्यान नुकताच नेहाने बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. ब्लू डेनिम डंगरी मधील नेहा आणि सोबत पती रोहनप्रीत यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने '#KhyalRakhyaKar.'(ख्याल रखया कर) असं कॅप्शन दिले आहे. नेहाच्या फोटोवर पतीची देखील कमेंट आहे. पण या फोटोवरून नेहाचे चाहते आणि नेटीझन्सनी ती लग्नापूर्वीच गरोदर होती? असा प्रश्न विचारत भुवया उंचवल्या आहेत.

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांचा पारंपारिक विधींनुसार 24 ऑक्टोबर 2020 ला विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नाच्या विविध सोहळ्याचे, सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत. मात्र या नव्या फोटोवरून नेटकर्‍यांनी नेहा आणि रोहनप्रीत यांना कमेंटमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाची ही चाहुल आहे का? असा प्रश्न विचारत नेहाच्या गरोदरपणाची बातमी कन्फर्म करून घेत आहेत. Neha Kakkar Sings Live for Husband Rohanpreet Singh Video: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नात सजली सूरांची मैफिल, रोमँटिक गाणे गाताना दिसले हे कपल.

नेहा कक्कड इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहा आणि रोहनप्रीतने लग्नापासून दुबई हनीमून ट्रीप पर्यंत सारे फोटोज, महत्त्वाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत त्यांना अपडेटेड ठेवलं होतं. बॉलिवूड मध्ये अभिनेत्री करिना कपूर, अनुष्का शर्मा यांच्याकडेदेखील गूड न्यूज आहे. 2021 मध्ये त्यांचं नवं बाळ जन्माला येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement