नवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी?

नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने घटस्फोटासोबतच तब्बल 30 कोटी रुपयांची पोटगी आणि मुंबईतील यारी रोड परिसरात 4 बीएचके फ्लॅट ची मागणी केल्याचे गॉसिप सुरु आहे. यावर आलियाने उत्तर देत यामध्ये पुर्ण सत्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवाजुदीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याचे वैवाहिक जीवन मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवाज ची पत्नी आलिया (Aaliya Siddiqui) हिने त्याच्यावर काही आरोप लगावत घटस्फोटाची मागणी केली होती. या मुद्द्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना आता आलियाने नवाज कडे तब्बल 30 कोटी रुपयांची पोटगी आणि मुंबईतील यारी रोड परिसरात 4 बीएचके फ्लॅट ची मागणी केल्याचे सुद्धा गॉसिप सुरु आहे. ‘माध्यमांमध्ये व्हायरल होणाऱ्या एका पोस्ट नुसार आलियाने नवाजुद्दीन कडे दोन्ही मुलांचा ताबा आणि 30 कोटींची पोटगी मागितली असल्याचे म्हंटले जातेय. आलियाने नवाजुद्दीनला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत समोर आली असून यात तिने काही मागण्या केल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे या सर्व चर्चांवर आलियाने ट्विटर च्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

पोटगीच्या चर्चांवर आलियाने एक ट्विट करत सांगितले की, "माझ्या वकिलांकडे अनेकांनी याबबाबत विचारणा केली मात्र हा नवाज आणि माझ्यातील वैयक्तिक मुद्दा आहे, त्यावर चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही. शिवाय ऑनलाईन दिसत असणारी नोटीस ही सुद्धा पीआर स्टंट म्हणून बदल करून व्हायरल केली गेली आहे त्यात पूर्ण सत्य नाही, त्यामुळे कोणीही त्यावर आधारित अर्धसत्य आणि खोट्या बातम्या पसरवू नये".

आलिया सिद्दीकी ट्विट

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या संसाराला 10 वर्ष झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. नवाज आपल्याला आणि मुलांना वेळ देत नाही तसेच त्याची घरातील वागणूक ही अपमानास्पद असते,त्यामुळे त्याच्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे असेही तिने सांगितले होते. आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अद्याप नवाजुद्दीनने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement