'ठाकरे' सिनेमाच्या डबिंगला सुरूवात, नवाझुद्दीनच्या मराठी ट्विटने चाहत्यांना सुखद धक्का

हा सिनेमा 23 जानेवारी 2019ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे बायोपिक Photo credits Twitter

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्त्व लवकरच रूपेरी पडद्यावर साकारले जाणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाझुद्दीनची झलक चाहत्यांसोबत शेअर करण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या डबिंगला सुरूवात करण्यात येणार आहे.

नवाझुद्दीनचं खास ट्विट

नवाझुद्दीन सिद्दीकीने काही तासांपूर्वी 'ठाकरे' चित्रपटाच्या डबिंगला सुरूवात करत असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांसोबत ही बातमी शेअर करताना नवाझुद्दीनने चक्क मराठीत ट्विट केल्याने अनेकांसाठी हा सुखद धक्का होता.

चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला

 

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 23 जानेवारी 2019ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत सिनेमाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजित पानसे यांनी सांभाळली आहे.



संबंधित बातम्या