Kadaisi Vivasayi Actress Kasiammal Murder: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा; दारूड्या मुलाने केली 'कदैसी विवासयी' फेम अभिनेत्री कासियाम्मलची हत्या

यानंतर कासियाम्मलच्या मुलाने अभिनेत्रीला लाकडी फळीने मारहाण केली. कासियाम्मल 74 वर्षांच्या होत्या.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Kadaisi Vivasayi Actress Kasiammal Murder: 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिट तमिळ चित्रपट 'कदैसी विवासयी' (Kadaisi Vivasayi) मधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कासियाम्मलची हत्या (Murder) करण्यात आली आहे. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रविवारी, 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता त्यांच्या मुलाने त्यांची हत्या केली. कासियाम्मल यांना त्यांच्या मुलाने बेदम मारहाण केली. वृत्तानुसार, त्याच्या मुलाचे काही मुद्द्यावरून अभिनेत्रीशी मतभेद झाले. यानंतर कासियाम्मलच्या मुलाने अभिनेत्रीला लाकडी फळीने मारहाण केली. कासियाम्मल 74 वर्षांच्या होत्या.

वृत्तानुसार, 4 फेब्रुवारी रोजी कासियाम्मल यांना त्यांचा मुलगा नम्माकोडी याने लाकडी स्लॅबने जबर मारहाण केली. दारू प्यायला पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद सुरू असताना कासियाम्मल यांनी आपल्या मुलाला पैसे देण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मुलाने त्यांची हत्या केली. त्याच्या घरातून लाकडी फळी जप्त करण्यात आली आहे. (हेही वाचा -मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्या Poonam Pandey विरुद्ध Fir दाखल, मॅनेजरवरही कारवाई)

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल -

अभिनेत्रीच्या मुलावर म्हणजेच 51 वर्षीय नम्माकोडी याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर भादंवि कलम 302 अंतर्गत खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. नम्माकोडी आपल्या पत्नीपासून विभक्त झाला होता आणि पैशासाठी आपल्या आईवर अवलंबून होता. या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. (वाचा - Poonam Pandey Fake Death Claim Case: पूनम पांडेविरुद्ध सिने कामगार संघटनेची FIR ची मागणी; AICWA ने विक्रोळीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लिहिले पत्र)

'कदैसी विवासयी' ची कथा -

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर दिग्दर्शक मणिकंदन यांच्या 'कदैसी विवसयी'मध्ये दिवंगत अभिनेते नल्लांदी आणि विजय सेतुपती होते. या चित्रपटात शेतकऱ्यांचे जीवन चित्रित करण्यात आले होते. याशिवाय हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट म्हणून निवडण्यात आला होता. 1 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नलांदी यांचे निधन झाले. 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार मिळाला.