Housefull 5: हाऊसफूल 5 चित्रपटात 'मुन्ना भाई'ची एन्ट्री, निर्माता साजिद नाडिदवाला यांची घोषणा

आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. आता या चित्रपटात कॉमेडीचा धमाकेदार तडखा पाहायला मिळणार आहे.

Sanjay Dutt in ‘Housefull 5’! pc TW

Housefull 5: कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे. आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. आता या चित्रपटात कॉमेडीचा धमाकेदार तडखा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा निर्माता साजिद नाडिदवाला याने प्रेक्षकांसाठी खूशखबर आणली आले. हाऊसफूल 5 चित्रपटाच डब्बल धमाला पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा- अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात हार्दिक पंड्यासोबत थिरकली अनन्या पांडे, पाहा व्हिडिओ)

हाऊसफूल 5 मध्ये अभिनेता 'संजय दत्त' यांची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात संजय दत्ता यांना घेण्यासाठी निर्मात्याने उत्सुकता दाखवली आहे. चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारची मुख्य भुमिका असणार आहे. निर्मात्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे आणि 'हाऊसफूल 5' मध्ये अभिनेता संजय दत्त झळकणार अशी माहिती दिली.

या चित्रपटात अक्षय सोबत, अनिल कपुर, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणखी काही कलाकार झळकणार आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटासाठी फार उत्सुकता दाखवली आहे. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तरुण मनसुखहानी हा चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपासून सुरु होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif