Sushant Singh Rajput Case: CBI चौकशीसाठी घराबाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला मिळणार पोलिस सुरक्षा
या विनंतीवरुन चौकशीसाठी बाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला तिच्या घरापासून DRDO गेस्ट हाऊसपर्यंत पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास 19 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीबीआयची (CBI) टीम मुंबई दाखल झाली आणि सध्या सांताक्रुझ मधील DRDO गेस्ट हाऊसवर सुरु आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची चौकशी सुरु असून तिला पोलिस सुरक्षा देण्याची विनंती सीबीआयने केली आहे. या विनंतीवरुन चौकशीसाठी बाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला तिच्या घरापासून DRDO गेस्ट हाऊसपर्यंत पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) देण्यात आली आहे.
सीबीआय चौकशीसाठी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक निरज सिंह, स्टाफ केशव बाचनेर मुंबईतील DRDO गेस्ट हाऊसवर काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत. दरम्यान रिया सुशांतला अनेक वर्षांपासून विष देत होती. तिच त्याची खूनी आहे, असे आरोप सुशांतच्या वडीलांनी रियावर केले आहेत.
ANI Tweet:
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाबाबात नवीनवी माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली नसून ती हत्या असावी असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. मुंबई-बिहार पोलिसांच्या वादानंतर सुप्रीम कोर्टाने प्रकरणाची तपास सीबीआयकडे सोपवला. दरम्यान सीबीआयकडून तपास सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, अशी आशा आहे.