मुंबई पोलिसांच्या SIT टीमने शाहरुख खान याची मॅनेजर Pooja Dadlani हिला धाडले समन्स

मुंबई पोलिसांच्या एसआयटी (SIT) टीमने आता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी (Puja Dadlani) हिला समन्स धाडले आहेत

Pooja Dadlani (Photo Credits-Instagram)

क्रुज ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकाऱ्यांच्या द्वारे जबरदस्ती वसूलीच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी आपला तपास अधिक वाढवला आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटी (SIT) टीमने आता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी (Puja Dadlani) हिला समन्स धाडले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमने पाठवलेल्या समन्सवर पूजा ददलानी हिने प्रकृती ठिक नसल्याचे सांगत वेळ मागितला आहे.

मुंबई पोलिसांकडून किरण गोसावीच्या एक्सट्रोशन प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणात पूजा ददलानी हिला सुद्धा चौकशीसाठी समन्स धाडले गेले आहेत मात्र तिने वेळ मागितला आहे. या समन्सनुसार तिला शनिवारी हजर रहावे लागणार होते.(Cruise Drugs Case: आर्यन खान याला NCB च्या SIT चे समन्स)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Dadlani (@poojadadlani02)

खरंतर एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने आपल्या जबाबात अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीच्या ज्या मर्सिडीज कारचा उल्लेख केला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज काही काळापूर्वी मुंबई पोलिसांना लोअर परेल येथे मिळाले होते. पोलिसांनी याची पुष्टी केली होती की, पूजा ददलानी हिची कार दिसून आली आहे. मात्र फुटेजमधील महिला दिसून येत होती ती पूजा ददलानीच होती याची पुष्टी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी कडून करण्यात येत आहे.एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीने शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिला पैशांऐवजी आर्यन खान याची अटक थांबवण्यासाठी आश्वासन दिले होते.