T-Series Vs MrBeast: चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी टी-सिरीजने पुढे केला भारती अस्मितेचा मुद्दा, लोकांनी ट्रोल करत विचारले सवाल
टी-सीरीजचे यूट्यूबवर 263 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. जगातील सर्वाधिक सबस्क्राइबर्स असण्याचा रेकॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून टी-सीरीजच्या नावे आहे. मात्र आता MrBeast या इन्फ्लुएन्सरचे सबस्क्राइबर्स हे 253 मिलियन झाले आहेत.
फिल्म प्रॉडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरीजचे यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स आहेत. सध्या युट्यूबर्सवर 263 मिलीयन सबस्क्राइूबर्स आहे. मात्र टी-सीरीजचं हे पहिलं स्थान आता धोक्यात आलं आहे. कारण मिस्टर बीस्ट (MrBeast) नावाचं चॅनल आता T-Series पासून केवळ 11 मिलियन सबस्क्राइबर्स दूर आहे म्हणजेच त्यांचे सबस्क्राइबर्स जवळपास 253 मिलीयन आहेत. यामुळे टी-सीरीजने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राइब करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. (हेही वाचा - Zee-Sony Deal: झीचे सोनीसोबतचे विलीनीकरण रद्द; कंपनीने मागे घेतले NCLT समोरील मर्जर इम्प्लीमेंटेशन ॲप्लिकेशन)
पाहा व्हिडिओ -
टी-सीरीजचे यूट्यूबवर 263 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. जगातील सर्वाधिक सबस्क्राइबर्स असण्याचा रेकॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून टी-सीरीजच्या नावे आहे. मात्र आता MrBeast या इन्फ्लुएन्सरचे सबस्क्राइबर्स हे 253 मिलियन झाले आहेत. यूट्यूब सबस्क्राइबर्सची ही लढाई टी-सीरीजने भारतीयांच्या अस्मितेची केली आहे. तुम्ही जर भारतीय असाल, तर 'टी-सीरीज'ला फॉलो करा असं आवाहन टी-सीरीज करत आहे. लेट्स युनाईट अँड क्रिएट हिस्ट्री नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
यापूर्वी 2019 साली टी-सीरीज आणि प्युडीपाय या यूट्यूबरमध्ये अशाच प्रकारची लढाई पहायला मिळाली होती. यावेळी देखील टी-सीरीजने भारतीय अस्मितेचा मुद्दा पुढे करत सबस्क्राइबर्स मिळवले होते. या सगळ्यात काही नेटिझन्स टी-सीरीजचं समर्थन करताना दिसत आहेत. मात्र, कित्येकांनी टी-सीरीजला ट्रोल देखील केलं आहे. एखाद्या कंपनीचे सबस्क्राइबर्स वाढवणे हा देशाच्या अस्मितेचा मुद्दा कसा असू शकतो? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

