Mr and Mrs Mahi Ttrailer Out: 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; राजकुमार रावचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवी कपूर उतरली क्रिकेटच्या मैदानात (Watch Video)

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातील जान्हवी आणि राजकुमारची अप्रतिम केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे.

Mr and Mrs Mahi Ttrailer (PC -Instagram)

Mr and Mrs Mahi Ttrailer Out: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr and Mrs Mahi) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असते. आज 'मिस्टर अँड मिस माही' चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. जान्हवी कपूरने या चित्रपटाचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते खूप उत्साहित झाले आहेत. 'मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर रिलीज होताच जान्हवी कपूर आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटापूर्वी दोघांनी ‘रुही’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातील जान्हवी आणि राजकुमारची अप्रतिम केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे.

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर खूपच दमदार आहे. मिस्टर आणि मिसेस माहीमध्ये दोघेही त्यांची स्वप्ने आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष करताना दाखवले आहेत. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा ओघ सुरू झाला आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, तुम्ही चित्रपटाची संपूर्ण कथा ट्रेलरमध्येच का दाखवली? (हेही वाचा - Sridevi Kapoor Chowk: लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील जंक्शनला दिले 'श्रीदेवी कपूर चौक' नाव; महान दिवंगत अभिनेत्रीला BMC ची खास आदरांजली)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

तथापी, मिस्टर अँड मिसेस माही हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी जान्हवीने क्रिकेटपटूच्या पद्धती शिकण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी 6 महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.