Sadak 2 Most Disliked YouTube Video: आलिया भट्ट, संजय दत्त यांच्या 'सडक 2' च्या ट्रेलरचा नवा विक्रम; ठरला भारतामधील सर्वाधिक नापसंत व्हिडिओ, जाणून घ्या काय म्हणाली पूजा भट्ट  

संजय दत्त (Sanjay Dutt), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर फिल्म 'सड़क 2' (Sadak 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी रीलीज झाल्यावर 'सडक 2' चा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली.

सडक-२ कलाकार (Photo Credits: File Photo)

संजय दत्त (Sanjay Dutt), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर फिल्म 'सड़क 2' (Sadak 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी रीलीज झाल्यावर 'सडक 2' चा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. मात्र हा ट्रेलर चांगल्या बाबतीत नाही तर, यूट्यूब वर जास्तीत जास्त नापसंद केल्याने ट्रेंड होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मागच्या 24 तासांमध्ये 15 मिलियन म्हणजेच 1 कोटी 50 लाख व्युज मिळाले आहेत. मात्र 'सडक 2' चा ट्रेलर आतापर्यंत 6.3  दशलक्षांहून अधिक वेळा डिसलाईक केला गेला आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ भारतामधील सर्वाधिक Disliked YouTube Video ठरला आहे.

बुधवारी, या ट्रेलरने एक दुर्मिळ असा महत्त्वाचा टप्पा गाठला. या व्हिडिओला तब्बल 95% टक्के लोकांनी नापसंत करून, तो जगातील सर्वाधिक नापसंत केल्या जाणाऱ्या व्हिडिओच्या यादीमध्ये 7 व्या क्रमांकावर पोहोचला. ज्याने स्वीडिश गेमर PewDiePie च्या 'Can this video get 1 million dislikes?' ला मागे टाकले, ज्याने 93 टक्के नापसंती मिळवली होती. ‘सडक 2’ हा चित्रपट महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासाठी फार महत्वाचा आहे, करण तब्बल 2 दशकानंतर ते या चित्रपटाद्वारे दिग्दर्शिक पदार्पण करीत आहेत. मात्र सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर देशात चित्रपट सृष्टीमधील घराणेशाहीबाबत संताप दिसून येत आहे. यामुळेच हा व्हिडिओ नापसंत केला गेला आहे. (हेही वाचा: आलिया भट आणि संजय दत्त चा 'सडक 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; ट्विटरवर युजर्स करतायत #BoycottSadak2 ला ट्रेंड)

पूजा भट्ट ट्वीट -

त्यानंतर आता पूजा भट्टने हा ट्रेलर नाकारणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पूजा भट्टने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘Hate. Debate. Malign. Lie. Boy’coot’. Scoot. Unfriend. Trend. Over the top? Why not? Gotta do what it takes to be host with the most with a hot bot’ पूजा भट्टचे हे ट्विट पाहून असे दिसते की चित्रपटाच्या ट्रेलरवर मिळालेल्या प्रतिसादामुळे ती खूप नाराज आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now