Padma Bhushan Award 2024: मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान, पहा व्हिडिओ

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दोन्ही स्टार्संनी प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Mithun Chakraborty awarded Padma Bhushan (PC - X/@FeluMittirr)

Padma Bhushan Award 2024: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि प्रसिद्ध गायिका उषा उथुप (Usha Uthup) यांच्यासाठी सोमवारचा दिवस खूप खास होता. सोमवारी, 22 एप्रिल रोजी, दोन्ही तारकांना त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते पद्मभूषण (Padma Bhushan 2024) देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दोन्ही स्टार्संनी प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, 'मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडून माझ्यासाठी काहीही मागितले नाही. जेव्हा मला फोन आला की तुम्हाला पद्मभूषण दिला जात आहे, तेव्हा मी एक मिनिट गप्प बसलो कारण मला ते अपेक्षित नव्हते. (हेही वाचा -Anant Ambani-Radhika Merchant Wedding: लंडनमध्ये होणार अनंत-राधिकाचं लग्न; 3 दिवस चालणार सेलिब्रेशन, नीता अंबानी करत आहेत खास तयारी)

माझ्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत - उषा उथुप

हा सन्मान मिळाल्यानंतर उषा उथुप यांनी एएनआयला सांगितले की, 'मी खूप आनंदी आहे. माझ्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. आपण सर्वकाही पाहू शकता. माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. तुमच्या देशाने आणि तुमच्या सरकारने तुमचं कौतुक केलं आहे, याहून अधिक कोणी काय मागू शकेल? मला खूप छान वाटतं कारण तुम्ही शास्त्रीय गायक असाल किंवा शास्त्रीय नर्तक असाल तुमच्या कलेला पुरस्कार मिळणं स्वाभाविक आहे. आपण सामान्य माणसे आहोत, त्यामुळे पद्म पुरस्कारासाठी निवड होणे ही मोठी गोष्ट आहे. कारण मी फक्त शांतता आणि बंधुत्वावर विश्वास ठेवते. मी एकसंघ शक्ती म्हणून फक्त एकतेवर विश्वास ठेवते. आपण एकमेकांसाठी काहीतरी करू शकतो.

या सेलिब्रिटींनाही मिळाला पद्मभूषण पुरस्कार -

मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांच्याशिवाय भजन गायक श्री कालुराम बामनिया आणि बांगलादेशी गायिका रेझवाना चौधरी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, साहित्य आणि क्रीडा यासारख्या श्रेणींमध्ये दिला जातो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now