Mission Raniganj Teaser: अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज'चा ट्रेलर रिलीज, चित्रपट सत्य घटनेवर आधारित

प्रेक्षकांनी चित्रपटाचा टीझर पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

Mission Raniganj

Mission Raniganj Teaser: बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचा बहु प्रतिक्षित चित्रपट मिशन राणीगंजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये पाहून प्रेक्षक हादरले आहे. हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित आहे, कोळसा खाणीत अडकलेल्या लोकांसाठी एक मिशन आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटात अक्षय कुमार पंजाबी लूकमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित हा चित्रपट 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पूजा एंटरटेनमेंटच्य बॅनरखाली बनलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना खूप आशा आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून अक्षय कुमारने या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.