Mission Mangal Trailer: भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा अवघड आणि अशक्य प्रवास उलघडणारा 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित! (Watch Video)

'मिशन मंगल' या सिनेमाची कथा प्रेरणादायी असून सामान्य लोकांचा भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास या सिनेमातून उलघडला आहे.

Mission Mangal Trailer (Photo Credits: Youtube)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या 'मिशन मंगल' (Mission Managal) या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी सिनेमाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक होते. आज सिनेमाचे ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाची कथा प्रेरणादायी असून सामान्य लोकांचा भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास या सिनेमातून उलघडला आहे. पहा सिनेमाचा टिझर (Video)

अक्षय कुमार याने सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "ही केवळ कथा नाही तर एक उदाहरण आहे एका अशक्य स्वप्नाचे जे भारताने पूर्ण केले. मिशन मंगलचा ट्रेलर आता रिलिज झाला आहे."

अक्षय कुमार याचे ट्विट:

पहा ट्रेलर:

'मिशन मंगल' या सिनेमात शर्मन जोशी, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि किर्ती कुल्हारी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एस. शंकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे जॉन अब्राहम याचा 'बाटला हाऊस', प्रभासचा 'साहो' आणि अक्षय कुमार याचा 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी एकत्र भिडणार आहेत. मात्र यात कोणता सिनेमा बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.