Mission Mangal Teaser: अक्षय कुमार, विद्या  बालन यांच्या  मिशन मंगल' सिनेमाचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Mission Mangal (Photo Credits: You Tube)

अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सह बॉलिवूड कलाकारांची फौज असलेल्या ' मिशन मंगल' या सिनेमाची पहिली झलक रसिकांसमोर आली आहे. सतीश धवन (Rakesh Dhawan) यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'मिशन मंगल' (Mission Mangal) या सिनेमामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. तर तारा शिंदे च्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. सिनेमामध्ये सामान्य व्यक्ती असामान्य गोष्टी करू शकतात, मोठी स्वप्न पाहू शकतात हा संदेश देणारा आहे. 'मिशन मंगल' हे भारताने मंगळावर पाठवलेलं पहिलं यान आहे. अक्षय कुमार याने पूर्ण केले जेसन स्टेथम चे Bottle Cap Challenge; पहा व्हिडिओ

मिशन मंगलची पहिली झलक

मिशन मंगल सिनेमा येत्या 15 ऑगस्ट 2019 दिवशी रिलीज होणार आहे. 'मिशन मंगल'च्या यशामुळे भारताचा विश्वास उंचावला होता. सिनेमाच्या पहिल्या टीझरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी यांची झलक पहायला मिळाली आहे. यंदा 15 ऑगस्ट दिवशी जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि प्रभासचा 'साहो' सिनेमा रिलीज होणार असल्याने बॉक्सऑफिसवर मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

जगन शक्ती यांनी 'मिशन मंगल' सिनेमा दिग्दर्शित केला आहे.