मिर्झापूर फेम Ali Fazal आणि Richa Chadha अडकले विवाहबंधनात? गुड्डू भैयाने शेअर केला मेहंदीचा फोटो (See Photo)

अलीने शेअर केलेल्या फोटोत एका महिलेच्या हाताला मेहंदी लागलेली दिसत आहे व तिच्या हातात फुले आहेत

Ali Fazal and Richa Chadha (Photo Credits: Instagram)

अभिनेता अली फजल (Ali Fazal) आणि अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) बर्‍याच दिवसांपासून एकत्र आहेत. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी मागच्यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोविड-19 मुळे त्यांना आपले लग्न पुढे ढकलावे लागले होते. आता या दोघांच्याही लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे व त्याला कारणही तसेच आहे. ली फजलने आज आपल्या इंस्टाग्रामवर एक मेहंदी लागलेल्या हाताचा फोटो शेअर केला आहे. चाहत्यांचा असा अंदाज आहे की हा रिचाचा फोटो असून, या दोघांनी गुपचूप लग्न केले आहे.

सेलिब्रेटींनीही या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांच्या टिप्पण्या पाहून दोघांच्या लग्नाविषयी अधिक खात्री होत आहे. अलीने शेअर केलेल्या फोटोत एका महिलेच्या हाताला मेहंदी लागलेली दिसत आहे व तिच्या हातात फुले आहेत. फोटो शेअर करताना अलीने लिहिले आहे, मोहब्बत विथ डूडल मेहंदी. मात्र अलीने रिचाला या फोटोमध्ये टॅग केले नाही. यापूर्वी रिचाने तिचा पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रिचाने सूटसह मोठे इयररिंग्स घातले आहेत. फोटो शेअर करताना रिचाने लिहिले की, 'हे माझ्यासाठी आहे.'

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

(हेही वाचा: गायिका Shareya Ghoshal झाली आई, गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट)

दरम्यान, रिचा व अली या दोघांची मैत्री 2013 मध्ये फुकरे या चित्रपटापासून सुरू झाली, त्यानंतर त्यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार होते मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ते घडले नाही. याआधी अनेकदा दोघे एकत्र बाहेर फिरताना व एकमेकांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करताना दिसले आहेत.