Mental Hai Kya- 'कंगना रनौत' आणि 'राजकुमार राव' चा 'मेंटल है क्या' वादाच्या भोवऱ्यात, इंडिअन सायकेट्रिक सोसायटीने केली सेन्सर बोर्डाला तक्रार
तसेच शीर्षकासहित आक्षेपार्ह्य सीन्सना कात्री लावायची मागणी करण्यात आली आहे.
2014 मध्ये अफलातुन हिट ठरलेल्या क्विन (Queen) चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली 'कंगना रनौत' (Kangana Ranout) आणि 'राजकुमार राव' (Rajkumar Rao) ही जोडी पुन्हा एकदा आपल्या 'मेंटल है क्या' (Mental Hai Kya) या नव्या कोऱ्या सिनेमासह बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डस् बनवायला सज्ज आहे. निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) च्या या 'मेंटल है क्या' चित्रपटाचं शीर्षक आणि पोस्टर हे देखील चांगलंच चर्चेत आहे. सिनेमाच्या पोस्टर वर कंगना आणि राजकुमार हे हातात ब्लेड घेऊन स्व-हानीचा इशारा करताना दाखवलेले असून, हे पोस्टर या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
मात्र मणिकर्णिका (Manikaranika) पाठोपाठ कंगनाचा हा ही सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय. 'मणिकर्णिका' सिनेमासाठी कंगना रानौतने घेतले 'इतके' मानधन ; दीपिका, प्रियंकालाही टाकले मागे
या सिनेमाच्या शीर्षकावरून हे वाद होत असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधी इंडिअन सायकेट्रिक सोसायटीने, (CBFC)चे चेअरपर्सन प्रसून जोशी यांना तक्रार करत पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्यानुसार हा चित्रपट हा मानसिक विकारांनी पीडित रुग्णांना आक्षेपार्ह्य दृष्टीने मांडत असून यात मानसिक विकारांचं अमानुष व अपमानकारक पद्धतीने प्रदर्शन केल्याने या रुग्णांच्या प्रति भेदभाव व कटुतेला खतपाणी मिळत असल्याचा दावा इंडिअन सायकेट्रिक सोसायटीने केलेला आहे. यासोबतच या चित्रपटाचे नाव बदलून यातील आक्षेपार्ह्य सीन्सना काढून टाकण्याची मागणी देखील या पत्रात केलेली आहे.
इंडिअन सायकेट्रिक सोसायटीने सेन्सॉर बोर्डला लिहिलेल्या पत्राचं ट्विट
यासंदर्भात THE HINDU ला माहिती देताना इंडिअन सायकेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष 'डॉ. मृगेश वैष्णव' सांगतात की, "NIMHANS आणि सरकारी आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार 2016 मध्ये भारतातील एक चतुर्थांश (1/4th) लोकसंख्या ही मानसिक आजारांनी पीडित असल्याचे उघड झाले आहे. या आजारांविषयी अजूनही अनेकांच्या मनात गैर समजुती पाहायला मिळतात, अनेक जण यावरील उपचारांसाठी ढोंगी बाबांच्या आहारी देखील जातात अशा वेळी एखाद्या सिनेमाचे असे शीर्षक भेदभाव वाढवत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. मानसिक आजारांवर मात करण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. अशा संकल्पना मांडणाऱ्या फिल्म मेकर मंडळींना आपण मेंटल म्हणू का?"असा सवालही त्यांनी केला.
या वादावर प्रमुख भूमिका करणाऱ्या कंगना रनौत आणि राजकुमार राव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
'मेंटल है क्या' ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म मेकर प्रकाश कोवेलमुदी यांची फिल्म 21 जूनला प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय