Mardaani 2 First Look: अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी 2 चित्रपटातील पोलीस वर्दीतील लूक प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji)हिचा आगामी चित्रपट मर्दानी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mardaani 2 First Look: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji)हिचा आगामी चित्रपट मर्दानी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर पुन्हा एकदा मर्दानी चित्रपटाच्या सिक्वलमध्ये राणी मुखर्जी एका खाकी वर्दीतील पोलिसांची भुमिका साकारत असल्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
मर्दानी हा चित्रपट 2014 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तर आता मर्दानीचा सिक्वलसाठी तयारी सुरु झाली आहे. मर्दानी 2 मधील राणीचा पोलीस वर्दीमधील लूक ईमानी पोलिसांसारखा दिसून येत आहे. याबद्दल तरण आदर्श यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राणी मुखर्जीचा लूक झळकवला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुराथन करणार आहेत. तर आदित्य चोप्रा यांची निर्मिती असणार आहे. 2019 च्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.