Manoj Bajpayee On Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लढवण्याच्या अफवांमध्ये मनोज बाजपेयींनी सांगितले सत्य; म्हणाले, 'हे कोण म्हणालं?'

आता निवडणूक लढवण्याच्या पार्श्‍वभूमीवर खुद्द मनोज बाजपेयी यांनीच यामागचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.

Manoj Bajpayee (फोटो सौजन्य - फेसबुक)

Manoj Bajpayee On Lok Sabha 2024: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) केवळ त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्यांच्या राजकीय प्रवासासाठी देखील खूप चर्चेत आहेत. मनोज बाजपेयी 2024 साली बिहारमधून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवू शकतात अशा बातम्या सोशल मीडिया आणि अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्या होत्या. आता निवडणूक लढवण्याच्या पार्श्‍वभूमीवर खुद्द मनोज बाजपेयी यांनीच यामागचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.

मनोज बाजपेयी यांच्याकडून अफवांचे खंडण -

गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडिया आणि अनेक प्लॅटफॉर्मवर अफवा पसरत होत्या की, मनोज बाजपेयी बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. मात्र, आता खुद्द अभिनेत्याने या अफवेला पूर्णविराम देत संपूर्ण सत्य सांगितले आहे. मनोज बाजपेयीने आपल्या X खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) यासंदर्भात एका मीडिया पोर्टलला उत्तर देताना लिहिले आहे की, 'ठीक आहे, मला सांगा, हे तुम्हाला कोणी सांगितले किंवा तुम्हाला काल रात्री काही स्वप्न पडले का? मला सांगा.' (हेही वाचा -Manoj Bajpayee ने केली भानुशाली स्टुडिओशी हातमिळवणी; मुंबईत सुरू केलं नव्या Courtroom Drama चित्रपटाचं शुटिंग)

मनोज बाजपेयी लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार -

अभिनेता द फॅमिली मॅन नंतर त्याच्या दुसऱ्या OTT रिलीज 'किलर सूप' साठी चर्चेत आहे. त्याच्या डार्क कॉमेडी थ्रिलर वेब सिरीजचा ट्रेलर दोनच दिवसांपूर्वी प्रेक्षकांसमोर आला आहे, जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. (हेही वाचा - Bhonsle Trailer: मनोज वाजपेयी यांचा पहिल्यांदाच मराठमोळा अंदाज दाखवणारा 'भोसले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मराठी अभिनेता संतोष जुवेकर देखील साकारणार महत्वाची भूमिका)

मनोज बाजपेयी 'किलर सूप'मध्ये ओटीटीवर प्रथमच कोंकणा सेन शर्मासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. ही वेब सिरीज 11 जानेवारी 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होत आहे. या वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच मनोज बाजपेयी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. जिथे तो खुनाच्या गुन्ह्यात अडकलेला दिसेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif