Manoj Bajpayee ने केली भानुशाली स्टुडिओशी हातमिळवणी; मुंबईत सुरू केलं नव्या Courtroom Drama चित्रपटाचं शुटिंग

चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही परंतु हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा चित्रपट असून भानुशाली स्टुडिओ आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने सुपर्णा वर्मा निर्मित आहे.

Manoj Bajpayee New Film (PC - Twitter)

Manoj Bajpayee New Film: तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ने रविवारपासून मुंबईत आपल्या 77 व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही परंतु हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा चित्रपट असून भानुशाली स्टुडिओ आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने सुपर्णा वर्मा निर्मित आहे. या चित्रपटातून ओटीटी मालिका बनवणारे दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत.

त्याच्या नवीन चित्रपटाच्या पदार्पणाबद्दल मनोज बाजपेयी म्हणतात, “जेव्हा विनोद भानुशाली आणि सुपरण एस वर्मा यांनी मला या कथेबद्दल सांगितले, तेव्हा मला ही कल्पना आवडली आणि मी लगेचच या सुंदर स्क्रिप्टचा एक भाग होण्यासाठी सहमत झालो. मला विश्वास आहे की हे कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना भुरळ घालेल. अपूर्व कार्की हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि रविवारी या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला खात्री आहे की हा चित्रपट लोकांना दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. (हेही वाचा - Shehnaaz Gill चे वडील Santokh Singh Sukh यांना जिवे मारण्याची धमकी; आरोपी म्हणाला, दिवाळीपूर्वीचं मारून टाकेन!)

त्याचवेळी, निर्माते विनोद भानुशाली यांनी सांगितलं की, “जेव्हाही मनोज बाजपेयी पडद्यावर येतो, तेव्हा तो तुम्हाला कथेवर आणि त्याने साकारलेल्या पात्राचा प्रेक्षकांवर वेगळाचं परिणाम होतो. त्याने साकारलेल्या पात्राच्या छोट्या-छोट्या बारीकसारीक तपशिलांकडे प्रेक्षक जोडले जातात. या पात्रासाठी तो आमचा एकमेव पर्याय होता."

ओटीटी मालिका दिग्दर्शित केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला अपूर्व सिंग कार्की, दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याबद्दल म्हणतो, 'या चित्रपटात मला आकर्षित करणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. चांगली कथा, अप्रतिम कलाकार आणि काही सशक्त निर्माते त्याला साथ देत आहेत. स्क्रिप्टने चित्रपटाचे नेतृत्व करण्यासाठी मनोज बाजपेयी सारख्या शांत पण स्पष्टवक्त्या अभिनेत्याची मागणी केली होती. या चित्रपटात काम करण्यासाठी तो तयार झाला, याचा आम्हाला आनंद होत आहे.” अपूर्वने यापूर्वी “अँस्पिरंट्स”, “सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड” आणि “फ्लेम्स” सारख्या मालिका दिग्दर्शित केल्या आहेत.

झी स्टुडिओज पुढील वर्षी मनोज बाजपेयींचा हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. झी स्टुडिओजचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल म्हणतात, “झी स्टुडिओ नवीन मनोरंजन क्षेत्रे शोधण्यासाठी आणि नेहमी गोष्टी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे. मनोजचा हा चित्रपट एक आकर्षक कोर्टरूम ड्रामा आहे आणि त्यात मनोज बाजपेयी कधीही न पाहिलेल्या पात्रात दिसणार आहे.