Mann Bairagi First Look: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'मन बैरागी' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
'मन बरौगी' (Mann Bairagi) असे या चित्रपटाचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल असे या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) चित्रपटाच्या रुपात एक जबरदस्त गिफ्ट देणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून ऐकायला मिळत होत्या. त्यानंतर स्वत: भन्साळींना आज आपण या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित करणार आहोत असे जाहीर केले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा लागलेल्या ते या चित्रपटाच्या फर्स्ट लूक कडे. अखेर हे पोस्टर प्रदर्शित झाले असून खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता प्रभास (Prabhas) ने सोशल मिडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मन बरौगी' (Mann Bairagi) असे या चित्रपटाचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल असे या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सांगितले.
असे सांगण्यात येत आहे की, हा चित्रपट मोदी यांच्या तरुणपणातील जीवनावर आधारित असेल, ज्याविषयी लोकांना कदाचित जास्त माहितीही नसेल. या कथेसाठी खूप अभ्यास करण्यात आला असून जवळपास 1 तासाचा हा चित्रपट असेल.
या चित्रपटाच्या पोस्टरला अभिनेता प्रभास ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमार ने ही हे पोस्टर आपल्या ट्विटरवर शेअर केले. हेही वाचा- Happy Birthday Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त अमित शहा, पीयुष गोयल, अशिष शेलार यांच्या सह दिग्गजांकडून जन्मदिनाच्या शुभेच्छा
संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत तर संजय त्रिपाठी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, भन्साळींना या चित्रपटाची कथा खूप भावली, त्यामुळे निर्माता म्हणून या चित्रपटाचा आपण एक भाग बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही.