Manish Malhotra Tests Positive for COVID19: फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; स्वत:ला होम क्वारंटाईन करत सोशल मीडियावर दिली माहिती

अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशलने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.

Manish Malhotra (PC - Instagram)

Manish Malhotra Tests Positive for COVID19: देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दररोज वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार कोरोना संसर्गाचे बळी पडले आहेत. आता फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून यासंदर्भात माहिती दिली. सध्या मनीष मल्होत्रा यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन केलं आहे.

मनीष मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात प्लसचे चिन्ह दिसत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी ताबडतोब स्वत: ला अलग केलं असून सध्या होम क्वारंटाईन आहे. मी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करीत आहे आणि माझ्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. कृपया सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. (वाचा - Pawan Kalyan Tests Positive for COVID19: दक्षिणात्य सुपरस्टार पनव कल्याण यांना कोरोनाचा संसर्ग)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

मनीष यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूड स्टार्संनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशलने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, 'वीर दी वेडिंग' फेम अभिनेता सुमित व्यास यालादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर यासंदर्भात माहिती दिली आहे.