Mandira Bedi ने इंस्टाग्रामवर Photos शेअर करत पतीसोबतच्या आठवणींना दिला उजाळा
पतीच्या निधनानंतर प्रथमच मंदिराने सोशल मीडियावर फोटोज शेअर करत पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि अँकर मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. राज यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांसह सिनेसृष्टीतील मित्रपरिवारालाही जबर धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर प्रथमच मंदिराने सोशल मीडियावर फोटोज (Photos) शेअर करत पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोत मंदिरा पती राज कोशल यांच्यासोबत दिसत आहे. यात दोघांनीही गळ्यात मेडल घातले आहे. पतीसोबतचे हे खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
यापूर्वी मंदिराने सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी बदलून ब्लॅक बॅकग्राऊंट सेट केले आहे. दरम्यान, राज कौशल यांचे 30 जून रोजी कार्डिअक अरेस्टमुळे निधन झाले. त्यानंतर सिनेसृष्टीतील मित्रमंडळींनी अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली होती. शनिवार, 3 जुलै रोजी राज कौशल यांच्या प्रेयर मीटचे देखील आयोजन करण्यात आले होते. (पती Raj Kaushal यांच्या निधनानंतर Mandira Bedi ने सोशल मीडियावर केला 'हा' मोठा बदल!)
पहा फोटोज:
View this post on Instagram
विशेष म्हणजे मंदिरा बेदीने स्वत: पतीच्या पार्थिव शरीराला खांदा देत अंतिम संस्कार देखील केले होते. दरम्यान, राज कौशल हे फ्लिम निर्माते असून त्यांनी 'प्यार मे कभी कभी' आणि 'शादी का लड्डू' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच काही जाहिरातींसाठी काम केले होते. मंदिरा-राज यांचे 1999 मध्ये लग्न झाले असून दोघांना दोन मुले आहेत. वीर 9 वर्षांचा असून 4 वर्षीय तारा हिला गेल्याच वर्षी त्यांनी दत्तक घेतले होते.
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2021 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

