भारतातील विमान उड्डाणांना Maldives मध्ये बंदी पण सोशल मीडियात युजर्सकडून Bollywood कलाकारांना ट्रोल करत शेअर केले Memes

तर भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमान सेवेवर बंदी ही घातले आहे.

Bollywood Celebs troll (Photo Credits-Twitter)

जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने सर्वांना त्याचा फटका बसला आहे. तर भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमान सेवेवर बंदी ही घातले आहे. यामध्ये युके, हाँगकाँग, कॅनेडा, सिंगापूर आणि इराण यांचा यामध्ये समावेश आहे. तर युके कडून प्रवासासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत भारतात जाण्याचे टाळावे असे सुद्धा असे ही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता मालदीव (Maldives) कडून सुद्धा भारतीय प्रवाशांवर तेथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मिनिस्ट्री ऑफ टुरिझम यांनी एक ट्विट करत असे म्हटले आहे की, भारतातील विमान उड्डाणांवर येत्या 27 एप्रिल पासून बंदी घातली आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, तुमचा पाठिंबा आणि सर्वांची सुरक्षितता पाहता हा निर्णय घेतला आहे.(Ananya Pandey Hot Photos: मालदीवमध्ये नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या अनाया पांडेच्या हॉट फोटोज सोशल मिडियावर लावली आग)

परंतु काही दिवसांपासून आपण पाहिले की, बॉलिवूड मधील बहुतांश कलाकांरांनी मालदीव मध्ये आपली सुट्टी घालवली आहे. यामध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांनी सुद्धा मालदीवला भेट दिल्याचे फोटो समोर आले होते. मात्र आता मालवदीवने भारतीय प्रवाशांना येथे बंदी घातल्यानंतर सोशल मीडियात युजर्सकडून बॉलिवूड कलाकारांना याच संदर्भात रोस्ट करुन मिम्स शेअर केले आहेत.(बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालदीव्स मधील फोटो शेअर करण्यावर संतापला नवाजुद्दीन सिद्दीकी, म्हणाला, 'थोडी तरी लाज बाळगा')

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बहुतांश बॉलिवूड कलाकारांसाठी मालदीव हे व्हेकेशन स्पॉट बनला होता. तसेच कालाकारांनी तेथील फोटो सुद्धा शेअर केले होते. परंतु त्यांच्या या फोटोवरुन काही कलाकारांनी सुद्धा त्यांना फटकारले. त्यांनी असे म्हटले की, कोरोनामुळे परिस्थिती खराब होतेय आणि लोक मालदीवमध्ये मजा करत आहेत. यामध्ये अनु कपूर आणि नवाजुद्दीन सिद्धिकी यांचा समावेश आहे.