Malayalam Actor Mamukkoya Passes Away: मल्याळी अभिनेता मामुकोया यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेताल अखेचा श्वास

ते 77 वर्षांचे होते. केरळ (Kerala) राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (26 एप्रिल) वाजता उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मामूकोया (Mamukkoya) यांनी मल्याली भाषेत चौफेर अभिनय केला.

Mamukkoya | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मल्याळी अभिनेते मामुकोया यांचे निधन (Malayalam Actor Mamukkoya Passes Away) झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. केरळ (Kerala) राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (26 एप्रिल) वाजता उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मामूकोया (Mamukkoya) यांनी मल्याली भाषेत चौफेर अभिनय केला. खास करुन त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. अभिनय आणि संवादातील अचूक टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते. अभिनय साकारताना अनेकदा ते मलबारी या बोलीभाषेचा वापर करत ज्याचा रसिकांवर जोरदार प्रभाव पडे.

स्थानिक भाषक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, मामुकोया हे फुटबॉल मैदानावर चाहत्यांसोबत सेल्फी घेत होते. दरम्यान, चाहत्यांची गर्दी वाढल्याने ते मैदानावरच कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांना मेंदूतील रक्तस्रावासह हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनकच होत गेली. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. (हेही वाचा, Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन)

मामुकोया यांनी मामूट्टी, जयराम आणि मोहनलाल यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत अभिनय केला आहे. असे असले तरी ते, सामान्य माणसाच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जात असत. मामूकोया यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामुकोया अनेक दशके मल्याळम विनोदी आणि नाटकांमध्ये सतत सक्रीय होते. त्यांनी 1979 मध्ये थिएटरमधून कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर चित्रपटांमध्ये विनोदी अभिनयास सुरुवात केली. त्यांनी उच्चारलेल्या मलबार बोलीने त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये एक प्रिय व्यक्ती बनवले.

ट्विट

दरम्यान, मामुकोया यांनी 2008 मध्ये 'इनाथे चिंता दृश्यम' चित्रपटात, शाजहानच्या भूमिकेसाठी मामुकोयाने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून केरळ राज्याकडून दिला जाणारा पहिला चित्रपट पुरस्कार जिंकला. कॉमेडी व्यतिरिक्त, त्यांनी भावनाप्रधान चित्रपटांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.