मलाइका अरोरा (Malaika Arora) हिचा हॉट आणि बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रत्येकवेळी घायाळ करतो. तसेच सोशल मीडियात आपल्या ग्लॅमरस लूकमधून ती प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असते. तर अशाच प्रकारचा एक हॉट-बोल्ड अंदाजातील फोटो मलाइका हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियात चर्चांना उधाण आले असून तिच्या या बोल्ड लूकबद्दलच बोलले जात आहे.
मलाइकाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने निळ्या रंगाटी मोनोकिनी घातली असून ती अत्यंत सेक्सी दिसून येत आहे. तर समुद्रात मजा-मस्ती करतानाचा हा फोटो आहे. या फोटोला तिने एक कॅप्शन दिले असून त्यात, 'आज शुक्रवार असून... वाढत्या उन्हामुळे समुद्रात मजामस्ती करत असल्याचे म्हटले आहे'. मलाइकाने पोस्ट केलेल्या या फोटोला 3 लाखांपेक्षा जास्त पसंदी मिळाली आहे.('Filmfare' मासिकावरील अभिनेत्री कैटरीना कैफ चे हॉट फोटो चर्चेत)
दरम्यान, मलाइका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याबद्दल सुद्धा चर्चा सुरु आहेत. तसेच मलाइका आणि अर्जुन बऱ्याच वेळा एकत्र फिरताना किंवा कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचे ही प्रेक्षकांनी पाहिले आहे. याच परिस्थितीत हे दोघे लग्न सुद्धा करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप मलाइका आणि अर्जुन यांनी लग्नाबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.