Malaika Arora Hot Photo: स्विमिंग पूल मध्ये योगा करताना दिसली मलायका अरोरा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

वर्कआऊट आणि योगावर नेहमी भर देणारी मलायकाने आता चक्क स्विमिंग पूल मध्ये योगा केला आहे.

Malaika Arora Photo (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोजमुळेही.. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका अरोरा आपले एकाहून एक हॉट आणि सोशल फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मिडियावर स्विमिंग पूलमध्ये योगा (Yoga in Swimming Pool) करताना एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील तिचे सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वयाच्या 47 वर्षी देखील मलायकाने स्वत:ला छान फिट ठेवले आहे. वर्कआऊट आणि योगावर नेहमी भर देणारी मलायकाने आता चक्क स्विमिंग पूल मध्ये योगा केला आहे. याचा एक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Malaika Arora Bold Photo: मलाइका अरोड़ा हिचा स्विमिंग पूल मधील बोल्ड फोटो; हॉट अवतार पाहुन चाहते घायाळ

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

पाण्यात उभे राहून ती योगसाधना करताना या पोजमध्ये दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नुकताच तिने आपला एक बिकिनी फोटो देखील शेअर केला होता. हा फोटो देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

मलायकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, मलायका सध्या चित्रपटांपासून थोडी दूरच आहे. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. तिच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरसोबतचे तिचे अफेअर आणि लग्न याबाबत ब-याच चर्चा रंगत आहे. या दोघांनी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन देखील गोव्यामध्ये एकत्र साजरी केले.