महेश मांजरेकर यांच्या फॅमिली फोटोवर नेटीझन्सकडून घाणेरडी कमेंन्ट; ‘तुझे ढूंढ निकालूंगा तू जहां भी होगा’ म्हणत मांजरेकरांनी दिली धमकी

बॉलिवुड अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी गुढीपाडव्या निमित्त (Gudi Padwa) सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या फॅमिलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) देखील होती. परंतु, मांजरेकर यांच्या या आनंदावर विरजन पडलं. कारण, त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर एका नेटीझन्सने घाणेरड्या भाषेत कमेंन्ट केली.

महेश मांजरेकर कुटुंब (PC - Instagram)

बॉलिवुड अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी गुढीपाडव्या निमित्त (Gudi Padwa) सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या फॅमिलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) देखील होती. परंतु, मांजरेकर यांच्या या आनंदावर विरजन पडलं. कारण, त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर एका नेटीझन्सने घाणेरड्या भाषेत कमेंन्ट केली.

या सर्व प्रकारामुळे महेश मांजरेकर यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी या नेटीझन्सला ‘तुझे ढूंढ निकालूंगा तू जहां भी होगा’, अशा शब्दात धमकी दिली आहे. ऋषी, असं या नेटीझन्सचं नाव आहे. दरम्यान मांजरेकर यांनी या युझर्सला धमकी देताना म्हटलं आहे की, सध्या कोरोना व्हायरसमुळे मला तुला शोधता येणार नाही. हे दिवस जाऊदे, मग बघ तुला शोधून काढून सांगणार...त्यासाठी मला कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालेल, असं म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: देशात लॉकडाऊन असताना लोकांनी केला दुधाच्या टँकरमधून प्रवास; रितेश देशमुख ने शेअर केला सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ: Watch Video)

 

View this post on Instagram

 

United we stand. Aaj Gudi Padwa, pan Corona var vijay milaun mag dhoom dhadakkyat sazra karu. Tover gharich raha, surakshit raha, kutumba sobat chaan vel ghalva

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

महेश मांजरेकर यांच्या फोटोवर नेटीझन्सची कमेंन्ट (Photo Credits: Instagram)

सोशल मीडियावरील या प्रकारामुळे महेश मांजरेकर अतिशय नाराज झाले आहेत. यावर मांजरेकर यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही शांत व्हा...अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, असंही एका युझर्सने म्हटलं आहे. महेश मांजरेकर यांनी शेअर केलेल्या या फोटोला कोरोना व्हायरसचं संकट असताना आम्ही सर्व एकत्र आहोत. आपण लवकरचं कोरोनावर विजय मिळवू. त्यामुळे आपल्या घरात कुटुंबासोबत रहा, असं आवाहनही मांजरेकरांनी आपल्या चाहत्यांना केलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now