Sarkaru Vaari Paata: महेश बाबूचा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'सरकारू वारी पाटा' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

निर्मात्यांचा दावा आहे की प्रादेशिक चित्रपट सरकारु वारी पाटा 2022 मध्ये तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त कमाई करणारा ठरला आहे.

Photo Credit - Social Media

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) नुकताच रिलीज झालेला 'सरकारू वारी पाटा' (Sarkaru Vaari Paata) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. महेश बाबूच्या चित्रपटाच्या नॉनस्टॉप कमाईने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अॅक्शन कॉमेडी चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. महेश बाबूच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. सरकारु वारी पाटा या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 200 कोटींचा व्यवसाय करून व्यापार तज्ज्ञांना चकित केले आहे. निर्मात्यांचा दावा आहे की प्रादेशिक चित्रपट सरकारु वारी पाटा 2022 मध्ये तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त कमाई करणारा ठरला आहे. प्रादेशिक चित्रपट असल्याने चित्रपटाचे कलेक्शन दमदार आहे. ते अजून कोणत्याही भाषेत डब केलेले नाही.

12 दिवसांत केला 200 कोटींचा टप्पा पार

हा चित्रपट परशुराम पेटला यांनी दिग्दर्शित केला आहे. महेश बाबू या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात महेश बाबूची जोडी कीर्ती सुरेशसोबत आहे. हा चित्रपट 12 मे रोजी रिलीज झाला होता. समीक्षकांनी महेश बाबूच्या 'सरकारू वारी पाटा' या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा गाठला. महेश बाबूचा स्वॅग लोकांची डोकी उंचावत आहे.

पुष्पाला टाकले मागे

महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांच्या 'सरकारू वारी पाटा' या चित्रपटाने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर पुष्पा द राइज या चित्रपटाला मागे टाकले आहे. पुष्पाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 166.82 कोटी रुपये कमवले. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 5.22 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.10 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 7.67 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 4.03 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच 12व्या दिवसापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 190.84 कोटी रुपये होते.



संबंधित बातम्या