Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश दिल्याने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून कपूर रुग्णालय, मुंबई पोलिसांना नोटीस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यातच सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनानंतर रिया चक्रवर्ती सुमारे 45 मिनिटे कपूर रुग्णालयाच्या (Cooper Hospital) शवगृहात उपस्थित होती. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (Maharashtra State Human Rights Commission) कूपर रुग्णालय व मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच रिया चक्रवर्तीला कोणत्या आधारावर शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली होती? याबाबतही संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. यामुळे हे प्रकरण आणखी नवीन वळण घेईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिया चक्रवर्ती ही ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने सीबीआयकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे, यासंबंधित रिया चक्रवर्ती मॅसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार रिया एका ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती, असे दिसून येत आहे. एकीकडे ड्रग्स बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे, असे श्वेताने म्हटले आहे. तर, दुसरीकडे रियाने कधीच ड्रग्सचे सेवन केले नाही, असा दावा रियाच्या वकिलांनी केला आहे. हे देखील वाचा- JEE and NEET Exam 2020: सोनू सूदची शिक्षण मंत्रालय, पीएमओला कडे जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; 'विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालू नये'

एएनआयचे ट्वीट-

सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच आज सीबीआय चौकशीचा सहावा दिवस आहे. याप्रकरणी सीबीआयने 4 साक्षीदाराकडून चौकशी करत आहे. ज्यात सिद्धार्थ पिठानीने केलेले विधान अतिशय महत्वाचे आहे.