Kangana Ranaut ची ड्रग्ज्स कनेक्शन बाबत चौकशी करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुंबई पोलिसांना आदेश

त्याचा दाखला अनिल देशमुखांनी विधानसभेत दिला आहे.

Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: ANI)

महाराष्ट्र विधीमंडळामध्येदेखील आज कंगना रनौत (Kangana Ranaut ) प्रकरणावरून गदारोळ माजल्याचं चित्रं पहायला मिळालं आहे. विधानसभेमध्ये बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरूद्ध मुंबई पोलिसांना (Mumbai Police) चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत या कारवाईचे आदेश दिल्याचं स्पष्ट केलं आहे. काल प्रताप सरनाईकांनी तशी तक्रार विधानसभा अध्यक्षांकडेदेखील केली होती.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये Adhyayan Suman यांनी कंगना रनौत ड्रग्ज घेते आणि ती मला देखील घेण्यास जबरदस्ती करत होती असा खबळजनक आरोप केला होता. त्याचा दाखला अनिल देशमुखांनी विधानसभेत दिला आहे. आता मुंबई पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. तसे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज विधानसभेत कंगना विरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. Kangana Ranaut-BMC Controversy: कंगना रनौत च्या पाली कार्यालयावर BMC ने बुलडोजर न चढवता केवळ नोटिस देऊन गेल्याने अभिनेत्रीने मानले जनतेचे आभार

ANI Tweet

कंगना रनौतने मुंबई पोलिसांची माफियांपेक्षाही भीती वाटते असं वक्तव्य करत पाकव्याप्त कश्मीर सोबत मुंबईची तुलना केली होती. त्यानंतर अनेक मुंबईकारांनी तिचा निषेध केला. त्यावेळेसही अनिल देशमुखांनी ज्यांना मुंबई मध्ये राहण्याची भीती वाटते त्यांना मुंबई, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं म्हटलं होतं.

आज सकाळी बीएमसीने देखील कंगनाला दणका दिला आहे. मुंबईमधील तिच्या ऑफिसच्या बाहेर नोटीस लावण्यात आली आहे.