IPL Auction 2025 Live

मुस्लिम समुदायाला लसीचे डोस घेण्यासाठी प्रोत्साहन करणार सलमान खान

नागरिकांना डोस घेण्यास प्रोत्साहन करण्यासाठी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि धार्मिक नेत्यांची मदत घेणार असल्याचा विचार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे.

सलमान खान (Photo Credits: Instagram)

कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. परंतु मुस्लिम समाजात कोरोनावरील लसीचे डोस घेण्यासाठी नागरिक घाबरत आहेत. याच कारणास्तव नागरिकांना डोस घेण्यास प्रोत्साहन करण्यासाठी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि धार्मिक नेत्यांची मदत घेणार असल्याचा विचार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे. कोरोनाच्या लसीकरणात महाराष्ट्र सर्वाधिक पुढे आहे. परंतु काही ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला गेलेला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, कोरोना व्हायरसच्या विरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सराकर बॉलिवूड अभिनेता सलमान खानसह मुस्लिम धर्मगुरुंची मदत घेणार आहे. त्यामुळे मुस्लिम परिसरात लोक लस घेण्यासाठी प्रोत्साहित होतील.(Schools Reopen in Maharashtra: पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरु होण्याचे राज्य सरकारचे संकेत)

दरम्यान, जालनामध्ये मुस्लिम बाहुल्य परिसरात आता पर्यंत कोरोना लसीकरणासंबंधित घाबरत आहेत. यासाठीच आम्ही ठरवले की, मुस्लिम समुदायात लसीचे डोस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सलमान खानसह धर्मगुरुंची मदत घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कारण कलाकार आणि मुस्लिम धर्मगुरुंचा प्रभाव पडतो आणि त्यांचे ऐकले जाते.

Tweet:

महाराष्ट्रात मंगळवारी 886 कोविड19 रुग्ण आढळले आणि 34 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात 66,25,872 रुग्ण आणि मृतांचा आकडा 140,636 वर पोहचला आहे. राज्यात सोमवारी 686 कोविड19 रुग्ण आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता.