Madhuri Dixit’s Single Candle Out: कोविड 19 च्या गंभीर काळात अविरत कार्य करणाऱ्या Real Heroes साठी माधुरी दीक्षित हिने गायले खास गाणे (Watch Video)
आता ती आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
डास्निंग क्विन माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) हिने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता ती आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. लॉकडाऊनमध्ये कार्यरत असणाऱ्या योद्धांसाठी 'Candle' हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. कोविड 19 च्या गंभीर काळात संपूर्ण जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणे आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारे गाणे तिने प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. माधुरी दीक्षित हिने हे गाणे गायले असून यापूर्वी गाण्याची झलक आपल्याला पाहायला मिळाली होती. आता संपूर्ण गाणे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले आहे.
माधुरी दीक्षित हिने गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कोरोनाच्या गंभीर संकटात काम करणारे खरे हिरो (Real Heroes) यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे शांत निवांत झालेल्या शहरांची झलक यात दिसते. तसंच व्हिडिओतून माधुरीचा सुमधूर आवाज कानी पडतो आणि तिचं सुंदर दिसणं पुन्हा एकदा मनाला सुखावून टाकतं. (माधुरी दीक्षितचे गायनामध्ये पदार्पण; वाढदिवसादिवशी शेअर केली आपल्या पहिल्या वहिल्या गाण्याची झलक, Watch Video)
पहा व्हिडिओ:
माधुरी दीक्षित हिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "आनंदी, उत्साही आणि थोडी नर्व्हस! हे माझे पहिले गाणे आहे. ज्याचा तुम्हीही आनंद घेऊ शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील तुम्ही या गाण्याची मजा घेऊ शकता. आम्ही हे गाणे बनवताना आम्ही जितका आनंद घेतला तितकाच आनंद तुम्हाला या गाण्यातून मिळेल, अशी आशा आहे." माधुरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.