Gangubai Controversy: 'माझ्या आईला समाजसेविकेऐवजी सेक्स वर्कर बनवलं'; चित्रपटावर भडकले गंगूबाईचे कुटुंब
गंगूबाईच्या कुटुंबाचे वकील नरेंद्र यांच्या मते, ट्रेलर रिलीज झाल्यापासून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. गंगूबाईंची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे.
Gangubai Controversy: 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाने त्यांच्या कौटुंबिक अडचणीत वाढ केली आहे. सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, लोकांच्या टोकदार प्रश्नांपासून वाचण्यासाठी हे कुटुंब आता वारंवार मुंबईतील घरे बदलत आहेत. गंगूबाईंनी चार मुले दत्तक घेतली होती. आज त्यांच्या कुटुंबाची संख्या 20 झाली आहे. इतकी वर्षे आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या या कुटुंबाचा त्रास चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वाढला आहे. एवढेचं नाही तर आपल्या आईवर कोणते पुस्तक लिहिले आहे हेही त्यांना आतापर्यंत माहीत नव्हते. नातेवाइकांमध्ये सतत चेष्टेचा विषय बनणाऱ्या त्यांच्या मुलाने आई (गंगूबाई) आणि कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
गंगूबाईच्या कुटुंबाचे वकील नरेंद्र यांच्या मते, ट्रेलर रिलीज झाल्यापासून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. गंगूबाईंची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. वेश्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्याचे प्रतिनिधित्व करण्यात येत आहे. हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? त्यांना व्हॅम्प आणि लेडी माफिया डॉन बनवले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथल्या व्यवस्थेचा मुद्दा असा आहे की, तुमच्या घराच्या इज्जतीचा खुलेआम लिलाव होत असेल, तर इथे त्यांची इज्जत वाचवण्याऐवजी तुम्ही मुलाकडून तो त्यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागत आहात, असं कुटुंबियांनी म्हटलं आहे. (वाचा - Gangubai Kathiawadi Song: गंगूबाईची इश्किया स्टाईल, आलिया भट्टच्या चित्रपटातील 'जब सैयां' गाणे प्रदर्शित)
लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी बदलत आहेत घर -
2020 पासून या कुटुंबियांचा लढा सुरू झाला आहे. ज्यावेळी त्यांच्या मुलाला समजले की, आपल्या आईवर एक पुस्तक आले असून एक चित्रपटही बनत आहे. चित्रपटाच्या प्रोमोसोबत त्यांच्या आईचा फोटो पाहिला, तेव्हा त्यांना कळले की, ही परिस्थिती आहे. सध्या हे कुटुंब पुन्हा लपून बसले आहे. कधी अंधेरी, कधी बोरिवली अशा ठिकाणी हे कुटुंब स्थलांतरित होत आहे. जे नातेवाईक आहेत, ते त्यांना सन ऑफ बीचचा मुलगा म्हणत आहेत. ज्यांना माहित आहे ते लोक विचारत आहेत की, तुझी आई खरोखर वेश्या होती का? परंतु, तुम्ही म्हणायचे की, ती समाजसेवक होती. पण चित्रपट काही वेगळेच सांगत आहे. जेव्हापासून हा गोंधळ झाला, तेव्हापासून घरातील सदस्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. कोणीही शांततेत जगू शकत नाही. आम्ही संजय लीला भन्साळी आणि लेखक हुसैन जैदी यांना नोटीस पाठवली आहे, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असं गंगूबाईंच्या मुलाने म्हटलं आहे.
माझ्या आईला वेश्या बनवले -
गंगूबाईचा दत्तक मुलगा बाबुरावजी शाह आजतक.इनशी बोलताना सांगतात, माझ्या आईला वेश्या म्हणून संबोधित करण्यात येत आहे. आता लोक माझ्या आईबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. मला बरे वाटत नाही. त्याच वेळी, त्यांची नात भारती म्हणते, निर्मात्यांनी पैशाची लालूच दाखवून माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. तुम्ही पुस्तक लिहिताना घरच्यांची संमती घेतली नाही, आमच्याकडे आला नाही, चित्रपट बनवण्यापूर्वी आमच्याकडून परवानगी घेतली नाही, असंही भारतीने म्हटलं आहे.
कामाठीपुरात राहणारी प्रत्येक स्त्री वेश्या कशी?
भारती पुढे सांगतात, माझ्या आजी कामाठीपुरा येथे राहत होत्या. मग तिथे राहणारी प्रत्येक स्त्री वेश्या झाली का? माझ्या आजीने तिथे चार मुलं दत्तक घेतली होती. जे वेश्येची मुले होती. माझ्या आईचे नाव शकुंतला रणजीत कावी होते. आम्ही त्याच्या कुटुंबातील आहोत. त्यांनी आम्हाला बेकायदेशीर म्हटले आहे. आमच्या आजीने दत्तक घेतले त्यावेळी कायदे केले गेले नाहीत.
कुटुंबाची इज्जत धुळीत मिळाली आहे -
एकीकडे आम्ही आमच्या आजींच्या कहाण्या अभिमानाने लोकांना सांगायचो, तर दुसरीकडे ट्रेलर आल्यानंतर आमची इज्जत धुळीला मिळाली आहे. लोक फोन करू लागले आणि म्हणू लागले की, तुझ्या आजीला वेश्या म्हटले जात आहे. माझ्या आजीने आयुष्यभर तिथल्या वेश्यांच्या उन्नतीसाठी काम केलं आहे. या लोकांनी माझ्या आजीचे काय केलं आहे? लोक आम्हाला वेश्येची मुले म्हणत आहेत. मी आणि माझे कुटुंब कॅमेऱ्यासमोर येण्यास टाळाटाळ करत आहोत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)