Lisa Haydon चा Baby Bump फ्लाँट करतानाच्या फोटोवर विचित्र कमेंट करणा-या ट्रोलरला अभिनेत्रीने घेतले फैलावर, अशा शब्दांत दिले सडेतोड उत्तर

त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या हटके अंदाजात त्या ट्रोलरला याचे उत्तर दिले आहे.

Lisa Haydon (Photo Credits: Instagram)

उत्कृष्ट मॉडल तसेच अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) तिस-यांदा आई होणार आहे. या महिन्यातच तिची प्रसूती होणार असल्याची तिने सोशल मिडियावर माहिती दिली आहे. आपले बेबी बंप फ्लाँट करतानाचे तिचे अनेक फोटोज सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लिसा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तिचे आपल्या पहिल्या दोन मुलांसोबतचे फोटोज देखील तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. दरम्यान नुकताच तिने बिकीनीतील तिचा बेबी बंप फ्लाँट करतानाचा फोटो पाहून एका युजरने "असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस!! तुला सतत गरोदर राहणं आवडतं का?" अशी कमेंट केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या हटके अंदाजात त्या ट्रोलरला याचे उत्तर दिले आहे.

लिसाने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यावर एका युजरने कमेंट केली. “असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस!! तुला सतत गरोदर राहणं आवडतं का?” अशी कमेंट युजरने लिसाच्या फोटोवर केली. यावर लिसा उत्तर देत म्हणाली, “हो मला आवडतं.. ही खूप खास वेळ आहे. मात्र हो आता अजून नाही. आता बाळाला जन्म दिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याकडे लक्ष देणार आहे.” असं उत्तर लिसाने युजरला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

लिसाने 2016 साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होतं. 2017 मध्ये तिने पहिल्या मुलाला म्हणजेच जॅकला जन्म दिला. तर 2020 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. लिसाच्या दुसऱ्या मुलाचं नाव लिओ असं आहे.हेदेखील वाचा- अभिनेत्री लिसा हेडनचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, बेबी बंपमधील आपल्या मुलासोबतचा भावूक फोटो केला शेअर

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

लिसाने ‘आयेशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती वो ‘हाउसफुल 3’, ‘द शौकीन्स’, रास्कल्स, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सारख्या सिनेमांमध्ये झळकली. यात तिच्या क्विनमधील पात्राचे तसेच तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif