Ram Mandir Bhumi Pujan in Ayodhya: गानकोकिळा लता मंगेशकर यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद; पंतप्रधान मोदींचे मानले विशेष आभार
सर्व रामभक्तांचे अधूर स्वप्न आज पूर्ण झाले असे लता दीदींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दिनानिमित्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विशेष आभार मानले आहे.
आज देशभरात अयोध्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) ऐतिहासिक सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मंत्रोच्चारांच्या गजरात, मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला. या निमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ट्विवटच्या माध्यमातून या ऐतिहासिक दिवसाबाबत विशेष आनंद व्यक्त केला. सर्व रामभक्तांचे अधूर स्वप्न आज पूर्ण झाले असे लता दीदींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दिनानिमित्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विशेष आभार मानले आहे.
या संदर्भात ट्विट करत लता दीदी म्हणाल्या, 'नमस्कार, अनेक राजांचे, अनेक पिढ्यांचे आणि सर्व रामभक्तांचे अधूरे स्वप्न आज पूर्ण होत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर बनत आहेत. शिलान्यास होत आहे. याचे सर्वात जास्त श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणी यांना जाते. कारण त्यांनी हा मुद्दा घेऊन रथ यात्रा करुन पूर्ण भारतात जनजागृती निर्माण केली होती आणि त्याचबरोबर माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील जाते.' Ram Mandir Bhumi Pujan: सुरेश रैना, बबिता फोगाटसह क्रीडापटुंनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनसाठी दिल्या शुभेच्छा; गौतम गंभीरने भारतीयांसाठी दिला 'हा' संदेश
'आज या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमन महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. आज कोरोना व्हायरसमुळे जरी असंख्य रामभक्तांना येथे जाता आले नाही तरीही त्यांचे तन-मन हे श्रीरामांच्या चरणांमध्येच असेल. मला आनंद आहे की हा भव्यदिव्य सोहळा माननीय नरेंद्रजींच्या हस्ते पार पडला. आजपासून माझे सर्व कुटूंब, सारे संसार हृदयातून एकच आवाज येत आहे जय श्रीराम.' असंही त्या पुढे म्हणाल्या.