दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर भारतीय सैनेला करणार कोटींचे दान

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्थ करण्यात आलं.

Lata Mangeshkar (Photo Credit: Facebook)

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्थ करण्यात आलं. या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसंच हा हल्ला म्हणजे पुलावामा हल्ल्यावर पाकिस्तानला मिळालेले चोख उत्तर आहे, यात कोणतेही दुमत नाही.

पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली होती. तर शहीद जवांनांसाठी अनेक डोळे ओलावले होते. इतकंच नाही तर शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. त्यानंतर आता भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी देखील भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर आपले वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) यांच्या पुण्यतिथी निमित्त म्हणजे 24 एप्रिलला भारतीय सैन्यासाठी 1 कोटी रुपये दान करणार आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकरांनीही ही माहिती दिली.

यापूर्वी लतादीदींनी ट्विट करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांविषयी संवेदना व्यक्त केली होती.