Lal Singh Chaddha: लाल सिंह चढ्ढा च्या शूटिंग दरम्यान आमिर खान याला दुखापत, औषध घेत अभिनेत्याने पूर्ण केले सिनेमाचे चित्रीकरण
शूटिंग वेळी आमिर खान याच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची बातमी समोर आली.
Lal Singh Chaddha: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या दिल्लीत त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा' याचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. शूटिंग वेळी आमिर खान याच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची बातमी समोर आली. मात्र सेटवरील एका सूत्राने अशी माहिती दिली की, काही अॅक्शन सिन्स वेळी शूट करताना आमिर याला ही दुखापत झाली. मात्र या कारणामुळे चित्रपटाच्या शूटिंमध्ये कोणतीच बाधा आली नाही. अभिनेत्याने आपली स्थिती जाणून घेत काही औषधे घेतल्यानंतर चित्रटाचे शूटिंग पुन्हा सुरु केले.(पाकिस्तानी न्यूज चॅनलची मोठी चूक; हत्या प्रकरणात आरोपी MQM लीडर ऐवजी दाखवला बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा फोटो (See Viral Post)
लाल सिंह चढ्ढा च्या टीमकडून शुटिंगसाठी सर्व पद्धतीची सुरक्षा आणि सावधगिरीच्या सर्व उपायांचे पालन केले जात आहे. एका महत्वपूर्ण रनिंग सीक्वेंसच्या शुटिंग वेळी आमिर याला अतिशय शारीरिक परिश्रम करावे लागले होते.(आमिर खान चा दिलदारपणा! PM-Cares Fund, CM Relief Fund आणि लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या कामगारांना गुप्त पद्धतीने केली आर्थिक मदत)
तर आमीर याच्या प्रत्येक भुमिकेबद्दस नेहमीच कौतुक केले जाते. हा चित्रपट टॉप हॅक्सच्या फॉरेस्ट गम्प पासून प्रेरित आहे. लाल सिंह चढ्ढा चित्रपटाचे अव्दैत चंदन यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात करीना कपूर आणि आमिर खान मुख्य भुमिकेत झळकणार आहेत.