Kriti Sanon Controversy: फेक न्यूजमुळे क्रिती सॅननचा संताप अनावर; 'कॉफी विथ करण' टॉक शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात केल्याचा आरोप

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्रीने शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार केला आहे. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.

Kriti Sanon Controversy: फेक न्यूजमुळे क्रिती सॅननचा संताप अनावर; 'कॉफी विथ करण' टॉक शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात केल्याचा आरोप
Kriti Sanon (Photo Credit - Facebook)

Kriti Sanon Controversy: नॅशनल अवॉर्ड विजेती क्रिती सॅनन (Kriti Sanon) सध्या काही खोट्या बातम्यांमुळे (Fake News) चर्चेत आली आहे. तिने करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण (Koffee With Karan) च्या एका एपिसोडमध्ये काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात केली आहे. आता अभिनेत्रीने या बातम्या खोट्या ठरवत कायदेशीर कारवाई केली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्रीने शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार केला आहे. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.

क्रिती सेननने इंस्टाग्राम स्टोरीवर काही बातम्यांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबतच तिने 'फेक न्यूज'चे स्टिकर लावले आहे. तसेच ‘फेक न्यूज अलर्ट’ असे लिहिले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ती फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. (हेही वाचा - Shahid Kapoor आणि Kriti Sanon पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज)

फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर क्रिती सॅननची कायदेशीर कारवाई -

क्रिती सॅननने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कॉफी विथ करणमधील काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात करत असल्याबद्दल अनेक लेख व्हायरल होत आहेत, जे खोटे आहेत. हे लेख पूर्णपणे बनावट आणि खोटे आहेत. ते अप्रामाणिक आणि वाईट हेतूने बनवले गेले आहेत. हे लेख बदनामीकारक आहेत. मला ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bobby Deol Sits On The Floor To Watch Animal: बॉबी देओलने थिएटरमध्ये जमिनीवर बसून पाहिला 'अॅनिमल' चित्रपट; चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला अभिनेता)

क्रिती सॅननने पुढे सांगितलं आहे की, मी शोमध्ये कोणत्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मबद्दल कधीच बोलले नाही. मी अशा खोट्या लेखांवर आणि अहवालांवर कायदेशीर कारवाई केली आहे. मी सर्वांना विनंती करते की, अशा गोष्टी करू नका. खोट्या बातम्यांपासून सावध रहा.

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).