Koffee With Karan Hamper: तब्बल 18 वर्षानंतर उलगडले रहस्य; जाणून घ्या कॉफी विथ करणच्या हॅम्परमध्ये नक्की काय असते (Watch Video)
'कॉफी विथ करण'मध्ये अनेक स्टार्स पाहुणे म्हणून येतात. या कार्यक्रमात ते त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलतात. दरवर्षी चाहते या शोची प्रतीक्षा करत असतात. या शोमधून अनेक गॉसिपसारख्या बातम्या समोर येतात ज्यामुळे या शोची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.
करण जोहरचा 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा चॅट शो नेहमीच चर्चेत असतो. या शोद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गुपिते बाहेर पडतात. गेली 18 वर्षे हा शो सुरु आहे व आता या शोचा 7 वा सीझन नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाला. या शोमध्ये घडलेल्या अनेक गोष्टींची चर्चा होते मात्र यामध्ये अशा दोन सर्वात प्रसिद्ध गोष्टी आहेत ज्याबाबत सर्वजण उत्सुक असतात. पहिली म्हणजे शोचा 'रॅपिड फायर राउंड' आणि दुसरी म्हणजे रॅपिड फायर जिंकल्यानंतर मिळणारा हॅम्पर.
'कॉफी विथ करण'चे स्वरूप प्रत्येक सिझननुसार बदलते. पण एक सेगमेंट असा आहे जो सुरुवातीपासून आहे तसाच राहिला आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. या सेगमेंटमध्ये, करण जोहर स्टार्सना प्रश्न विचारतो, ज्याची पटापट उत्तरे द्यावी लागतात. या फेरीतील विजेत्याला एक खास असा हॅम्पर मिळतो. गेली अनेक वर्षे या हॅम्परमध्ये नक्की काय असते याची उत्सुकता होती. याबाबत अनेक अहवालही समोर आले आहेत मात्र आतापर्यंत त्याची ठोस माहिती समोर आलेली नव्हती.
आता 7 व्या सीझनमध्ये पहिल्यांदाच सेलिब्रेटी त्यांच्या घरी जो हॅम्पर घेऊन जातात त्यावरील पडदा उठला आहे. करण जोहरने नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने या हॅम्परमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत.
हिऱ्यांच्या दागिन्यांपासून ते खोया मिठाईपर्यंत अनेक वस्तू या हॅम्परमध्ये दिल्या जात आहेत. सीझन 7 च्या हॅम्परमध्ये करण जोहरचा ज्वेलरी ब्रँड Tyaani Jewellery, Marshall Acton II Speakers, Audi Espresso Mobile, Amazon Echo Show 10, Vahdam Tea आणि Tea Maker Set, Neuhaus Chocolates’ Collection Discovery Box, Bombay Sweet Shop, Khoya Sweet, 28 Baker Street आणि Koffee With Karan चा मग यांचा समवेश होता.
करणने असेही सांगितले की, या गिफ्ट हॅम्परमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचे उघडपणे ब्रँडिंग करता येत नाही त्यामुळे त्या दाखवल्या गेल्या नाहीत. याशिवाय, विजेत्यांना एक मिस्ट्री हॅम्पर देखील दिला जातो, ज्यामधील गोष्टी या गुप्त ठेवल्या जातात. (हेही वाचा: सोनम कपूर झाली सुपर मॉम, मेकअप करताना केलं बाळाला ब्रेस्टफीड! सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा)
'कॉफी विथ करण'मध्ये अनेक स्टार्स पाहुणे म्हणून येतात. या कार्यक्रमात ते त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलतात. दरवर्षी चाहते या शोची प्रतीक्षा करत असतात. या शोमधून अनेक गॉसिपसारख्या बातम्या समोर येतात ज्यामुळे या शोची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. याच शोमुळे कंगना रनौत आणि करण जोहर यांच्यामधील भांडणात पहिल्यांदा ठिणगी पडली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)