प्रसिद्ध गायक गुलशन कुमार यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

लवकरच ती आर माधवन (R. Madhavan) सोबत 'दही चिनी' या चित्रपटात झळकणार आहे.

Kushali Kumar (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची एन्ट्री दमदार सुरु आहे. त्यात चित्रपटाच्या प्रमोशन सोबत या स्टार किड्सचे प्रमोशन करणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे. आतापर्यंत जान्हवी कपूर, ईशान खट्टर, टायगर श्रॉफ, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्या सारख्या ब-याच स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. यात लवकरच आणखी स्टार किड्सची वर्णी लागणार आहे ती म्हणजे प्रसिद्ध गायक गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार (Khushali Kumar). लवकरच ती आर माधवन (R. Madhavan) सोबत 'दही चिनी' या चित्रपटात झळकणार आहे.

टाईम्स नाऊ च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विन नील मणी करणार आहेत. ही माहिती चित्रपट तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यात माधव आणि खुशाली चे चित्रपटातील एक पोस्टर ही झळकत आहे.

खुशाली ने देखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन हे पोस्टर शेअर केले असून 'आपल्याला ही संधी दिल्याबद्दल मी खूप खूश आहे. तसेच आपल्याला माधवन सारख्या कलाकारासोबत डेब्यू करायला मिळत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे, असे खुशाली ने लिहिले आहे.'

हेही वाचा- बॉलिवूडमध्ये होणार 'या' नव्या Star Kid चे पदार्पण

खुशाली ही सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख ६३ हजार फॉलोअर्स आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif