Sunny Leone Denied to Perform at Kerala University: केरळ विद्यापीठात (Kerala University) बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा किलर डान्स होणार होता. पण अचानक केरळ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सनी लिओनीच्या डान्स परफॉर्मन्सला परवानगी नाकारल्याची बातमी समोर आली आहे. हा कार्यक्रम 5 जुलै रोजी तिरुअनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये होणार होता.
वृत्तानुसार, केरळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहनन कुन्नम्मल यांनी रजिस्ट्रारला सनी लिओनीचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या कार्यक्रम यादीतून वगळण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (कुसॅट) येथे एका मैफिलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत 60 हून अधिकजण जखमी झाले होते. (हेही वाचा - Taapsee Pannu Hot Pic: तापसी पन्नूने पिवळ्या साडीतील तिचे हॉट फोटो केले शेअर, पाहा फोटो)
Actor Sunny Leone denied to perform at Kerala University: Reportshttps://t.co/lMm6RHQW5A
— India Today Showbiz (@Showbiz_IT) June 13, 2024
दरम्यान, सनीने तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मुहूर्ताची पूजा करतानाचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूजा करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय सनी 'कोटेशन गँग'मध्येही दिसणार आहे.