कैटरीना कैफ चा ब्रायडल लुक होत आहे व्हायरल; जया आणि अमिताभ बच्चन दिसले कन्यादान करताना
अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटद्वारे हे फोटो शेअर केले आहेत. तुम्हाला ते पाहून नक्कीच असं वाटलं असेल ना की तुमची लाडकी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.
कैटरिना कैफचे ब्रायडल लुक मधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटद्वारे हे फोटो शेअर केले आहेत. तुम्हाला ते पाहून नक्कीच असं वाटलं असेल ना की तुमची लाडकी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. परंतु, हे फोटो आहेत तिच्या एका ऍड शूट दरम्यानचे. विशेष म्हणजे या ऍडमध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, नागार्जुन, शिवराज कुमार आणि प्रभुदेवा यांसारखे बडे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत.
या ऍड शूट दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. कैटरिना तिच्या लग्नाच्या लेहेंगा मध्ये नववधूच्या रूपात दिसत आहे. तर जया आणि अमिताभ बच्चन हे तिच्या आई- वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत.
त्या दोघांनी अत्यंत रॉयल पारंपारिक उत्तर-भारतीय शैलीतील पोशाख परिधान केलेला दिसून येतो. तर काही फोटोंमध्ये ते दक्षिण भारतीय शैलीतील कपड्यांमध्ये दिसतात.
पुढे, दक्षिण सुपरस्टार्सबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत बिग बींनी लिहिले, “जया आणि माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण... भारतीय चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक लिजंड्सची 3 सुपरस्टार मुलं, आमच्याबरोबर एकत्र काम करत आहेत... खरंच हा एक सन्मान आहे... अक्किनेनी नागेश्वरा राव यांचा मुलगा नागार्जुना, मुलगा डॉ. राज कुमार यांचा मुलगा शिवराज कुमार, शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभुदेवा."