Bollywood Karva Chauth 2022: यावर्षी Alia Bhatt आणि Katrina Kaif सह 'या' लोकप्रिय अभिनेत्री साजरा करणार आपला पहिला करवा चौथ
करवा चौथच्या व्रतासाठी बॉलिवूड अभिनेत्री देखील खूप उत्सुक दिसतात. याच वर्षी इंडस्ट्रीतील अनेक जोडपी लग्नाच्या बंधनात बांधली गेली आहेत, त्यामुळे अशा जोडप्यांचा हा पहिलाच करवा चौथ असेल.
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी करवा चौथ व्रत पाळले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची चतुर्थी तिथी दरवर्षी बदलते. या वर्षी ही तारीख गुरुवार, 13 ऑक्टोबर 2022, गुरुवार आहे, त्यामुळे यंदा 13 ऑक्टोबरला करवा चौथ व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत ठेवतात. संध्याकाळी पूजा-अर्चना केल्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडतात. करवा चौथ व्रतामध्ये कथेला विशेष महत्त्व आहे.
करवा चौथच्या व्रतासाठी बॉलिवूड अभिनेत्री देखील खूप उत्सुक दिसतात. याच वर्षी इंडस्ट्रीतील अनेक जोडपी लग्नाच्या बंधनात बांधली गेली आहेत, त्यामुळे अशा जोडप्यांचा हा पहिलाच करवा चौथ असेल. (हेही वाचा: Urvashi Rautela ने Karwa Chauth निमित्त साडी नेसून, भांगात भरले कुंकू; युजर्सनी दिला Rishabh Pant चा नाद सोडण्याचा सल्ला)
आलिया भट्ट-
या यादीत पहिले नाव आहे अभिनेत्री आलिया भट्टचे. याचा वर्षी आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले. आता लवकरच ते पालक होणार आहेत, अशा परिस्थितीत त्यांचा करवा चौथ आणखी खास असणार आहे.
कतरिना कैफ-
पंजाबी सून कतरिना कैफचाही हा पहिलाच करवा चौथ आहे. तिने अभिनेता विकी कौशलशी लग्न केले. यावेळी कतरिना तिचा पहिला करवा चौथ तिच्या सासरच्या मंडळींसोबत साजरा करणार आहे.
करिश्मा तन्ना-
टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना या वर्षी फेब्रुवारीमध्ये बिझनेसमन वरुणशी विवाहबद्ध झाली. करिश्माचाही हा पहिला करवा चौथ असेल.
अंकिता लोखंडे-
लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे घरातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करते. यंदा तिच्या घरी करवा चौथचे खास सेलेब्रेशन आहे, कारण हा तिचा पहिला करवा चौथ आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले.
मौनी रॉय-
अभिनेत्री मौनी रॉयनेही याचवर्षी जानेवारीत उद्योगपती सूरज नांबियारशी लग्न केले. मौनी बऱ्याच दिवसांपासून सूरजला डेट करत होती. अखेर गोव्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मौनीदेखील यंदा आपला पहिला करवा चौथ साजरा करेल.
शिबानी दांडेकर-
अभिनेत्री शिबानी दांडेकरही पहिल्यांदाच करवा चौथ साजरा करणार आहे. तिने फेब्रुवारीमध्ये फरहान अख्तरशी लग्न केले.
शीतल ठाकूर-
अभिनेता विक्रांत मेस्सीची पत्नी अभिनेत्री शीतल ठाकूरदेखील यंदा आपला पहिला करवा चौथ साजरा करणार आहे.
पायल रोहतगी-
अभिनेत्री पायल रोहतगीने यावर्षी जुलैमध्ये संग्राम सिंगशी लग्न केले. यंदाचा करवा चौथ हा पायलचा पहिला करवा चौथ असेल. दरम्यान, हे व्रत सलग 12 वर्षे किंवा सलग 16 वर्षे पाळले जाते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर या व्रताचे उद्यानपण केले जाते. ज्या विवाहित महिलांना हे व्रत आयुष्यभर ठेवायचे आहे ते आयुष्यभर हे व्रत करू शकतात. या व्रतासारखे दुसरे शुभ व्रत नाही असे समजले जाते, त्यामुळे विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी हे व्रत दरवर्षी पाळावे असे सांगितले जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)