Kartik Aaryan Tests Positive for COVID-19: कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण; IIFA Awards मध्ये सहभागी होणार नाही

मात्र, कोरोनाला ते राहावलं नाही.' आता कोविडमुळे आयफा अवॉर्ड्ससाठी त्याचे अबुधाबीला जाणेही पुढे ढकलण्यात आले आहे.

Kartik Aaryan (PC - Instagram)

Kartik Aaryan Tests Positive for COVID-19: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दुसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात आला आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टला कॅप्शन देताना कार्तिकने लिहिलं आहे की, 'सर्व काही पॉझिटिव्ह चाललं होतं. मात्र, कोरोनाला ते राहावलं नाही.' आता कोविडमुळे आयफा अवॉर्ड्ससाठी त्याचे अबुधाबीला जाणेही पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी, कार्तिक दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात आला होता.

कार्तिक आर्यनला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. एका युजरने कार्तिकच्या कोकी या टोपणनावाचा उल्लेख करत लिहिले, 'कोकी काळजी घ्ये, लवकर बरा हो.' दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही लवकर बरे व्हाल, काळजी करू नका.' त्याचवेळी दुसऱ्याने कोविडलाचं कार्तिकचा फॅन म्हटलं आहे. (हेही वाचा -Jawan Teaser: शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर रिलीज)

कार्तिक सध्या त्याच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यांत 144.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'शेहजादा' चित्रपटात दिसणार आहे. हा साऊथचा चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो'चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोघे यापूर्वी 'लुका छुपी'मध्ये एकत्र दिसले होते.