Kareena Kapoor Khan दुस-यांदा आई झाल्यानंतर बहिण करिश्मा कपूर हिने करीनाचा बालपणीचा 'तो' फोटो शेअर करुन व्यक्त केला मावशी झाल्याचा आनंद
त्यांच्या बाजूला करिश्मा कपूर उभी आहे
करीना कपूरच्या (Kareena Kapoor) चाहत्यांसह तिच्या कुटूंबाला करीनाला काय होणार याची उत्सुकता लागली होती. आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही बातमी वा-यासारखी सर्वत्र पसरली. ही बातमी ऐकल्यानंतर अवघ्या सिनेसृष्टीकडून आणि चाहत्यांकडून करीनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच करीनाची मोठी बहिण करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण मावशी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यात करिश्माने करीना कपूरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
करिश्माने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पिता रणधीर कपूरने नवजात करीनाला हातात घेतले आहे. त्यांच्या बाजूला करिश्मा कपूर उभी आहे.हेदेखील वाचा- Kareena Kapoor Khan आणि Saif Ali Khan यांना पुत्ररत्न; दुसऱ्यांदा आई झाली करीना कपूर
'ही माझी बहिण, जेव्हा जन्मली होती आणि आता ती आई झाली आहे. यासोबत मी पुन्हा एकदा मावशी झाली आहे' असे करिश्माने या फोटोला कॅप्शन दिले आहे.
करिश्मा कपूरसह रिद्धिमा कपूर सहानी, दिया मिर्जा, महिप कपूर, मनिष मल्होत्रा, अमृता अरोड़ा आणि पूनम दमानिया सारख्या अनेक सेलिब्रिटीजनी करीनाला शुभेच्छा दिल्या.
बेगम करीनाने आज तिच्या दुसर्या मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. शनिवारी रात्रीच करीना कपूर खानला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे तिने मुलाला जन्म दिला आहे. या बातमीनंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे चाहते तसेच इतर सेलेब्जही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करीना कपूरने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाविषयी माहिती दिली होती.