Father's Day 2020: पितृदिन निमित्त करिना कपूरने शेअर केला सैफ- तैमुर चा खास फोटो

सैफ अली खान (Saif ali Khan) आणि तैमुरचा (Taimur) एका कॅन्डिड फोटो करिनाने शेअर करताच तो सोशल मीडीयात व्हायरल देखील झाला आहे.

Kareena, Saif and Taimur | (Photo Credits: Instagram)

आज 21 जून दिवशी जगभरात पितृदिन म्हणजेच फादर्स डे (Father's Day 2020) साजरा केला जात आहे. आपल्या जगभरात वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी विविध प्लॅनिंग केले जात आहे. अशामध्ये बॉलिवूड स्टार्स देखील आपल्या खास अंदाजामध्ये हा दिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा स्टार किड तैमुर अली खानसाठी देखील आजचा दिवस स्पेशल आहे. करिना कपूराने (Kareena Kapoor) आज फादर्स डे निमित्त एक स्पेशल फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सैफ अली खान (Saif ali Khan) आणि तैमुरचा (Taimur) एका कॅन्डिड फोटो करिनाने शेअर करताच तो सोशल मीडीयात व्हायरल देखील झाला आहे. Father's Day 2020: रेणुका राहुल देशपांडे ते जिजा आदिनाथ कोठारे पर्यंत सोशल मीडिया वर गाजल्या 'या' मराठमोळ्या बाप लेक/लेकीच्या जोड्या! (See Photos & Video).

करिना कपूर खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सैफ खूर्चीवर बसला आहे आणि त्याच्या लेकाकडे (तैमुर) पाहत आहे. यामध्ये तैमुरही काही खाताना त्याच्याकडे पाहतोय असा हा क्षण आहे. करिनाने हा फोटो शेअर करताना 'बाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत टीम, हॅप्पी फादर्स डे' अशी कॅप्शन लिहली आहे.

करिनाची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

He'll always have your back Tim... ❤️🤗 #HappyFathersDay

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिनानेही ही पोस्ट करताच काही मिनिटांत त्यावर फॅन्सकडून लाईक्स, शुभेच्छांचा वर्षाव झाला. सध्या लॉकडाऊनमुळे खान कुटुंब घरामध्येच असल्याने तैमुर सोबत अनेकदा मजामस्तीचे फोटो करिना शेअर करते. सैफच्या काही ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्येही अधून मधून तैमुरची झलक पहायला मिळते. त्याच्या या गोड अंदाजाचही फॅन्सकडून कौतुक होत असतं.

करिना लवकरच आमिर खान स्टारर फिल्म 'लाल सिंह चड्ढा' मध्ये अमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif