करीना ने सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसह बनवले जबरदस्त आर्टवर्क, सोशल मिडियावर शेअर केला फोटो

ज्यात वेगवेगळ्या रंगाचे हातांचे ठसे बनवलेले दिसत आहे. यात सैफ, तैमुर आणि करीनाच्या हातांचे ठसे आहेत.

Saif Ali Khan Family (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊन मुळे सर्व बॉलिवूड कलाकार मंडळी आपल्या घरात आपल्या कुटूंबासोबत छान वेळ घालवत आहे. बिझी शेड्यूलमध्ये प्रथमच त्यांना आपल्या कुटूंबासह इतका छान वेळ घालवायला मिळत आहे. या संधीचे सोने करत अनेक कलाकार बच्चे कंपनीसह वेगवेगळे अंतरंगी, गंमतशीर व्हिडिओज, फोटोज शेअर करत आहे. सध्या स्टार किड्समध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेला तैमूर (Taimur) देखील आपल्या आई-बाबा म्हणजेच करीना (Kareena kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) सह छान वेळ घालवत आहे. नुकतीच करीनाने मुलगा तैमूर आणि पती सैफसह काढलेली एक सुंदर पेटिंग शेअर केले आहे. त्याचा एक फोटो करीनाने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सैफ अली कान एक सफेद रंगाचा मोठा कपडा हातात घेऊन उभा आहे. ज्यात वेगवेगळ्या रंगाचे हातांचे ठसे बनवलेले दिसत आहे. यात सैफ, तैमुर आणि करीनाच्या हातांचे ठसे आहेत. करण जौहर च्या मुलांचा 'आंख मारे' गाण्यावर क्युट डान्स सोशल मिडियावर व्हायरल, Watch Video

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Quarantine 2020 imprinted for life... SAK, KKK and TAK... spreading hope and faith ❤️ #QuaranTimDiaries #InhousePicasso

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

या फोटो खाली करीनाने 'क्वारंटाईन 2020 मध्ये आयुष्यभरासाठी सैफ, करीना आणि तैमूरने छापले आशा आणि विश्वासाचे प्रतीक' असे लिहिले आहे. या फोटोला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, करीना लवकरच 'लाल सिंह चड्ढा' (Lal Singh Chaddha)मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif