करण जौहर च्या मुलांचा 'आंख मारे' गाण्यावर क्युट डान्स सोशल मिडियावर व्हायरल, Watch Video

या व्हिडिओमध्ये यश आणि रूही रणवीर सिंह (Ranveer Singh) च्या 'आंख मारे' या गाण्यावर डान्स करत आहेत. या दोघांचा हा क्युट डान्स सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

करण जौहर च्या मुलांचा 'आंख मारे' गाण्यावर क्युट डान्स सोशल मिडियावर व्हायरल, Watch Video
Yash And Ruhi (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे सर्व सिनेजगत, टिव्ही मालिका आणि वेब सीरिज चे शूटिंग बंद करण्यात आले आहे. यामुळे सर्व कलाकार घरात बसून आपल्या चाहत्यांसी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. आपल्या चाहत्यांचे सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हे कलाकार त्यांचे मनोरंजन करत आहेत. तसेच लॉकडाऊन दरम्यान आपले लाडके कलाकार काय करतायत हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यामुळे हे कलाकार आपले वर्कआऊटचे, पाककलेचे, डान्सचे व्हिडिओज शेअर करत आहे. यात नुकताच दिग्दर्शक करण जौहर (Karan Johar) ने आपली मुले यश (Yash) आणि रूही (Ruhi) चा एक सुंदर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये यश आणि रूही रणवीर सिंह (Ranveer Singh) च्या 'आंख मारे' या गाण्यावर डान्स करत आहेत. या दोघांचा हा क्युट डान्स सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेदेखील वाचा- लॉकडाऊनच्या काळात करण जोहरच्या 'या' कृत्यावर त्याची मुले यश आणि रूही ने नोंदवला आक्षेप, पाहा पोट धरुन हसायला लावणारा हा व्हायरल व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

We started the morning with a dance performance! Watch me being dragged to the dance floor! #lockdownwiththejohars #aankhmarey

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

या व्हिडिओमध्ये करणची आई हिरू एक खुर्चीवर बसली असून त्यांच्यासमोर यश आणि रूही या गाण्यावर अंतरंगी डान्स करत आहे आणि या दोघांचा प्रोत्साहन देऊन यांचा हा क्युट व्हिडिओ शूट करत आहे.

Madhuri Dixit Birthday Special: माधुरी दीक्षित बद्दलच्या खास गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत - Watch Video

या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पसंत केला आहे. अनेक बॉलिवूडकरांनी हा व्हिडिओ पाहिला असून छान कमेंट्स केले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2020 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).