सैफ अली खान याच्या सोबत लग्न करण्याच्या निर्णयावर करीना कपुर हिच्यावर बहुतांश जण झाले होते नाराज, अभिनेत्रिने केला खुलासा
यामध्ये करीन कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने एका मुलाखतीत तुमच्या भुवया उंचावल्या जातील असा एक खुलासा केला आहे
लॉकडाऊनमुळे बॉलिवूड कलाकार परिवारासोबत वेळ घालवत आहेत. तसेच जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत आहेत. याच काळात बॉलिवूड कलाकारांचा थ्रो बॅक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान आता करीना हिचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये करीन कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने एका मुलाखतीत तुमच्या भुवया उंचावल्या जातील असा एक खुलासा केला आहे. करीना हिने असे म्हटले आहे की, सैफ अली खान (Saif Ali Khan) सोबत लग्न करण्याच्या निर्णयावर बहुतांश जणांनी त्याच्यासोबत लग्न करु नको अशी चेतावणी दिली होती.
करण जौहर याचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण यामध्ये करीने हिने याबाबत अधिक खुलासा केला आहे. लोकांनी करीनाला सैफ सोबत लग्न करु नको असे म्हटले होते. तिला असे सांगत होते की, सैफ हा विवाहित असून त्याला दोन मुल सुद्धा आहेत. त्याचा घटस्फोट झाला असला तरीही तु त्याच्यासोबत लग्न केल्यास तुझे करिअर उद्धस्त होऊन जाईल. असे करीना हिला लोकांनी सांगितले होते तसेच तिच्या निर्णयावर बहुतांश जणांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती.(Gulabo Sitabo: अमिताभ बच्चन यांनी दिले आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विराट कोहली अशा 7 सेलेब्जना खास चॅलेंज; जाणून घ्या कोणी केले पूर्ण)
करीना हिने पुढे असे म्हटले आहे की, खरंच लोकांनी विचारले सैफ सोबत लग्न करणार आहेस? या सर्व गोष्टींमुळे असे वाटायचे की प्रेम करणे हा अपराध आहे का? लग्न करणे हा मोठा अपराध आहे का? तर ठिक आहे लग्न करुन बघुयाच. करण आणि प्रियंका चोप्रा यांनी करीनाच्या या निर्णयाची तारीफ सुद्धा केली होती. तर 'टशन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करीना यांच्यामधील जवळीक अधिक वाढू लागली होती. सैफ याने करीनाला लग्नासाठी प्रपोज केले होते. 4 वर्ष डेट केल्यानंतर करीनाने 2012 मध्ये सैफ सोबत लग्नगाठ बांधली.